शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवार

काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवितात. शेतकऱ्यांची फसवणूक व लूट करणाऱ्यांना घटकांना धडा शिकवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवार
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवार

जुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची भूमिका केंद्र सरकार घेत नसल्याने शेतीमाल टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतीमालाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी बाजार समित्यांनी शीतसाखळी उभारावी. काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवितात. शेतकऱ्यांची फसवणूक व लूट करणाऱ्यांना घटकांना धडा शिकवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.  जुन्नर बाजार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समितीचे संस्थापक, माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. ५) झाले. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते, अशोक पवार, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, सत्यशील शेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या पंचायत राज, सहकार चळवळीत माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे यांचे मोठे योगदान आहे. जुन्नर बाजार समितीची स्थापना करून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांनी केले.’’   श्री. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम केले. हा वारसा त्यांचे पुत्र सभापती संजय काळे सक्षमपणे पुढे नेत आहेत. मात्र आता शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन होत असून, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतीमालाला दर मिळत नाहीत. त्यामुळे तो टाकून द्यावा लागतो. शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी शेतीमाल प्रक्रियेसह साठवणुकीसाठी शीतसाखळी बाजार समित्यांनी उभारणे गरजेचे आहे.’’  गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘‘केंद्र सरकार छुप्या पद्धतीने सहकार क्षेत्र अडचणीत आणण्याचे काम करत आहे. सहकाराची चळवळ समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे.’’ या वेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सभापती काळे, आमदार बेनके यांनी मनोगत व्यक्त केले. जुन्नर हापूस देशात प्रसिद्ध कोकणातील हापूस आंब्याची जशी लोक आठवण काढतात, तसा आता जुन्नरचा हापूस संपूर्ण देशामध्ये जायला लागला आहे. त्यामुळे जुन्नर हापूस देशात प्रसिद्ध आहे. त्याच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com