agriculture news in marathi The elements need to be taught a lesson to those who cheat and rob farmers by Sharad Pawar | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवितात. शेतकऱ्यांची फसवणूक व लूट करणाऱ्यांना घटकांना धडा शिकवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. 

जुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची भूमिका केंद्र सरकार घेत नसल्याने शेतीमाल टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतीमालाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी बाजार समित्यांनी शीतसाखळी उभारावी. काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवितात. शेतकऱ्यांची फसवणूक व लूट करणाऱ्यांना घटकांना धडा शिकवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. 

जुन्नर बाजार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समितीचे संस्थापक, माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. ५) झाले. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते, अशोक पवार, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, सत्यशील शेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या पंचायत राज, सहकार चळवळीत माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे यांचे मोठे योगदान आहे. जुन्नर बाजार समितीची स्थापना करून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांनी केले.’’  

श्री. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम केले. हा वारसा त्यांचे पुत्र सभापती संजय काळे सक्षमपणे पुढे नेत आहेत. मात्र आता शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन होत असून, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतीमालाला दर मिळत नाहीत. त्यामुळे तो टाकून द्यावा लागतो. शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी शेतीमाल प्रक्रियेसह साठवणुकीसाठी शीतसाखळी बाजार समित्यांनी उभारणे गरजेचे आहे.’’ 

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘‘केंद्र सरकार छुप्या पद्धतीने सहकार क्षेत्र अडचणीत आणण्याचे काम करत आहे. सहकाराची चळवळ समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे.’’ या वेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सभापती काळे, आमदार बेनके यांनी मनोगत व्यक्त केले.

जुन्नर हापूस देशात प्रसिद्ध
कोकणातील हापूस आंब्याची जशी लोक आठवण काढतात, तसा आता जुन्नरचा हापूस संपूर्ण देशामध्ये जायला लागला आहे. त्यामुळे जुन्नर हापूस देशात प्रसिद्ध आहे. त्याच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...