दोडामार्गात हत्तीकडून केळी, सुपारीसह अन्य पिकांचे नुकसान

तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत (ता. दोडामार्ग)दोन हत्तींचे पुनरागमन झाले आहे. या हत्तींनी गावातील सत्यवान गवस यांची केळीबाग होत्याची नव्हती केली आहे.
दोडामार्गात हत्तीकडून केळी, सुपारीसह अन्य पिकांचे नुकसान
दोडामार्गात हत्तीकडून केळी, सुपारीसह अन्य पिकांचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी ः तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत (ता. दोडामार्ग)दोन हत्तींचे पुनरागमन झाले आहे. या हत्तींनी गावातील सत्यवान गवस यांची केळीबाग होत्याची नव्हती केली आहे. याशिवाय अन्य काही शेतकऱ्यांचे देखील हत्तींनी मोठे नुकसान केले आहे.गेले काही महिने हत्तीचा उपद्रव कमी होता. परंतु आता हत्ती परतल्यामुळे शेतकरी बैचेन झाले आहेत. बांदा परिसरात गव्यांच्या कळपाकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. त्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे गव्यांकडून नुकसान सुरू असतानाच आता बांबर्डेत (ता. दोडामार्ग) दोन हत्तींचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात हत्तीचा वावर नव्हता.त्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. परंतु पुन्हा हत्ती आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शनिवारी रात्री परतलेल्या दोन हत्तींनी बांबर्डेत येथील सत्यवान गवस यांच्या १०० हुन अधिक केळी जमीनदोस्त केल्या. ज्याज्या वेळी हत्ती येतात त्यावेळी सुरुवातीला केळीचे नुकसान करतात. याशिवाय त्यांच्या सुपारी आणि मका पिकांचे देखील नुकसान हत्तींनी केले आहे. याशिवाय गावातील विठ्ठल गवस, मनोहर गवस, हनुमंत गवस, वासुदेव गवस यांच्या केळी व अन्य पिकांचे नुकसान हत्तींनी केले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या शेतकऱ्यांनी केळीसह भुईमूग, कुळीथ, चवळी, मूग, कलिंगड, वाल, मुळा यासह विविध पिके घेतात. याशिवाय या भागात नारळ, सुपारी आदी पिके देखील घेतात. हत्तीमुळे या पिकांना धोका निर्माण झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील वीजघर, घाटीवडे, बांबर्डे, केर, मोर्ले, पाळये, सोनावल, घोटगेवाडी या गावांतील शेतीचे हत्तींकडून नुकसान केले जाते. आता दोन हत्ती परतल्यामुळे या सर्व गावातील शेतीला धोका निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com