पुणे जिल्ह्यातील अकरा धरणे भरली

पुणे : सप्टेंबरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसत आहे. धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ११ धरणे शंभर टक्के भरली आहेत.
 Eleven dams in Pune district filled up
Eleven dams in Pune district filled up

पुणे : सप्टेंबरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसत आहे. धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ११ धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी (ता.१३) खडकवासला, पवना, वीर, मुळशी, नीरा देवघर, गुंजवणी अशा धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

यंदा जिल्हयात जून, जुलै बहुतांशी भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. यामुळे पश्चिम भागात अनेक ठिकाणी मुसळधार तर पूर्व भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये पावसाने काही प्रमाणात ओढ दिल्याने पाणी पातळीत फारशी वाढ झालेली नव्हती. मात्र, चालू महिन्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होऊन ती भरू लागली आहेत. आत्तापर्यंत धरणांत एकूण १८५.८६ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १९४.७१ टीएमसी म्हणजेच ९८ टक्के पाणीसाठा झाला होता.  

जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, पवना, वरसगाव, कासारसाई, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, नीरा देवघर, वीर, वडज, चिल्हेवाडी अशा धरणातून पाण्याचा विसर्ग मुळा व भीमा, कऱ्हा, नीरा, मुठा, पवना, आरळा, इंद्रायणी नदीत सोडण्यात आला. त्यामुळे नद्या काही प्रमाणात दुथडी भरून वाहत आहेत. येत्या काळात चांगलाच जोर वाढला, तर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन विसर्ग वाढविण्यात येईल. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी काही धरणे तुडूंब भरली आहेत. 

आठ धरणे ९० टक्केपार

वडज, कळमोडी, चासकमान, आंध्रा, पवना, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, नीरा देवघर, भाटघर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर डिंभे, भामा आसखेड, वडिवळे, कासारसाई, मुळशी, गुंजवणी, वीर, चिल्हेवाडी ही धरणे ९० टक्केच्यावर भरली आहेत. तर नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, घोड, विसापूर या धरणात ८० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com