Agriculture news in Marathi, Elgar, the farmer's meeting against insurance companies from August 3 | Agrowon

विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन ऑगस्टपासून एल्गार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वंचित ठेवून हजारो कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्या कमावीत आहेत. याविरोधात किसान सभेतर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती ३ ऑगस्टपासून पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे. याविषयीची माहिती किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे यांनी बुधवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली. 

औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वंचित ठेवून हजारो कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्या कमावीत आहेत. याविरोधात किसान सभेतर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती ३ ऑगस्टपासून पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे. याविषयीची माहिती किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे यांनी बुधवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली. 

पंतप्रधान पीकविमा योजनेत धोरणात्मक बदल करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई वाटप करण्यात यावे, यासाठी किसान सभेतर्फे राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे. वर्ष २०१७ -१८ मध्ये परभणी जिल्ह्यात १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याच वेळी विमा कंपनीचा नफा १०७ कोटी रुपयांचा आहे. मराठवाड्यात २०१८-१९ मध्ये  १२३७ पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तर २०१८-१९ मधील विमा कंपन्यांचा नफा १२३७ कोटी रुपये आहे. 

एकूणच विमा कंपन्या शेतकऱ्यांना अक्षरश: लुटत असताना, शासकीय स्तरावर विमा कंपन्यांना अभय दिले जात आहे. पुणे येथे होणाऱ्या आंदोलनात विदर्भ, मराठवाडा, खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक जाधव, सचिव कैलास कांबळे, दौलतराव जाधव, संजय आव्हाड, महादू काकुळते, शंकर राऊतराय यांची उपस्थिती होती.

अशा आहेत मागण्या 

  • राज्य शासनाने स्वत:ची स्वतंत्र पीकविमा कंपनी स्थापन करावी 
  • गेल्या दोन वर्षांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईसाठी आदेश जारी करावा 
  • उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेले पीक कापणी प्रयोग रद्द करावेत
  • दुष्काळ जाहीर करण्यासाठी आधारभूत घेतलेले कापणी प्रयोग आधारभूत धरून पीकविमा भरपाई वाटप करण्याचे आदेश द्यावेत 
     

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...