agriculture news in marathi Elgar will call for struggle again says Raju Shetty | Page 2 ||| Agrowon

सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात संघर्षाचा एल्गार : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

सरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा संघर्षाचा एल्गार पुकारणार आहोत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून एफआरपी जाहीर केली नाही. गाळपास ऊस नेण्यासाठी शेअर होल्डर होण्याचे बंधन घालणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सोयाबीनचे दर कोसळण्याच्या संकटास केंद्र सरकारची शेतकरी विरोधी धोरणे त्यास कारणीभूत आहेत, या विरुद्ध सरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा संघर्षाचा एल्गार पुकारणार आहोत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

परभणी जिल्ह्यातील पिंगळी (ता. परभणी) येथे मंगळवारी (ता. ९) रात्री आयोजित ऊस व सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे (सोलापूर), किशोर ढगे (परभणी), दिगंबर पवार, भगवान शिंदे, केशव आरमळ आदी उपस्थित होते.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘जून महिन्यात सोयाबीनचे दर अकरा हजार रुपये होते, त्या वेळी यंदा आंदोलनाची वेळ येणार नाही असे वाटले होते. परंतु केंद्र सरकारने १२ लाख टन सोयापेंड आयात केली. कच्चे खाद्यतेल आयात केले.साठवणुकीवर मर्यादा घातल्या. त्यामुळे सोयाबीनचा खप कमी होऊन दर कोसळले.पाऊस उघडून महिना झाला तरी अजून ओलावा, माती, डागील माल असल्याचे कारण सांगत भाव पाडून सोयाबीनची खरेदी केली जात आहे.दर सुधारण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क पूर्ववत ३० टक्के करावे. केंद्र सरकार ढोंगी आहे.ते शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर व्यापारी दलालांच्या फायद्याची धोरणे राबवीत आहे. विमा कंपन्या राजकीय नेत्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही नाही.’’

‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चळवळ उभी केल्यामुळे राज्यातील साखर कारखानदारांना आर्थिक शिस्त लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर, इथेनॉलचे दर वाढत आहे. निश्‍चित दरापेक्षा साखरेस जास्त दर मिळत आहेत. येत्या आठ दिवसांत साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर करावी. शेअर घेण्याची सक्ती करू नये. सरकार आणि कारखानदारांना जाब विचारणे एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांना आक्रमक व्हावे लागेल,’’ असे श्री. शेट्टी म्हणाले.

एकत्र येण्याची गरज
‘‘एकीकडे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व्हावं म्हणायचे अन् दुसरीकडे सोयाबीनचे दर पाडायचे सरकारची ही दुटप्पी भूमिका कामाची नाही. सोयाबीन उत्पादक संघटित नाहीत म्हणून कमी दराने खरेदी केली जात आहे. पुढाऱ्यांमागे लाचारीने फिरणे बंद करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज आहे,’’ असे श्री. तुपकर म्हणाले.

 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...