Agriculture News in Marathi Eligible 159 applications for Pune District Bank | Agrowon

पुणे जिल्हा बँकेसाठी १५९ अर्ज पात्र

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे आणि ज्ञानेश्वर दाभाडे बिनविरोध झाले आहेत.

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे आणि ज्ञानेश्वर दाभाडे बिनविरोध झाले आहेत. दाखल उमेदवारी अर्जाची ८ डिसेंबरपासून माघारी घेण्यास सुरुवात झाली आहे.

पहिल्याच दिवशी बारामती तालुका मतदारसंघातून सतीश काकडे काकडे यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध झाले आहेत. येत्या २२ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. मंगळवारी (ता.७) छाननी झालेल्या अर्जामध्ये १३ अर्ज बाद झाले असून, १५९ अर्ज पात्र ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली.  

निवडणुकीत १७२ उमेदवारांनी एकूण २९९ अर्ज दाखल केले होते. छाननीअंती पुरंदर आणि भोरमधील ‘अ’ वर्ग तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्या ठिकाणी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, घोषणेची औपचारिकता बाकी आहे. यामध्ये पुरंदरमधून काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा समावेश आहे. तसेच आंबेगावमधून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ही बिनविरोध निवडून आले आहे. मावळमधून ज्ञानेश्वर दाभाडे यांचीही बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

पुरंदर ‘अ’ वर्ग तालुका सोसायटी मतदार संघात सहकारी संस्थेतील अनुभवाचा दाखला संस्थेच्या लेटरहेडवर जोडलेला नाही व शिक्का नसल्याने प्रकाश पवार यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. त्यामुळे केवळ संजय जगताप यांचाच अर्ज राहिला आहे. भोर तालुका ‘अ’ वर्ग विकास सोसायटी मतदार संघातील उमेदवार ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी संचालक अनुभवाचा दाखला जोडलेला नसल्यामुळे त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांचाच एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे चारही उमेदवारांच्या विजयाची घोषणा बाकी आहे.
 


इतर बातम्या
अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला काय हवे...लवकरच २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक...
कृषी तंत्रज्ञान,ॲक्वाकल्चर क्षेत्रातील...२०२२ च्या केंद्रीय अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
पेनटाकळी प्रकल्पबाधित गावांना तातडीने...बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
नवीन बोअरवेलऐवजी `फ्लशिंग’वर भर नागपूर : उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
वाशीमलाही मिळाला १५ कोटींचा वाढीव निधी वाशीम ः जिल्ह्यातील विकासकामांना निधीची गरज...
जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू लिलाव गटाची...जळगाव ः जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, चोपडा येथील तीन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक ...सोलापूर ः राज्यात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा...
शेतीमालाच्या विक्रीसाठी मूल्यसाखळी...सोलापूर ः शेतकरी उत्पादनात आता पुढे आहेत. त्यांना...
जळगाव : खासगी संस्था, सोसायट्यांच्या ...जळगाव : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे...
सांगलीत पीक कर्जवाटपात बॅंकांचा हात...सांगली ः रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम झाली...
‘पाच हजार १२२ कुटुंबांना परभणी...परभणी ः ‘‘‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत...
परभणीत ३८.९१ लाखांच्या निधीची कामे...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकात्मिक...
क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना ११.९०...कोल्हापूर : उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...