आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर करा 

मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे बाजार बंद आहेत. वाहतुकीमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी आंब्याची वाहतूक थांबली आहे. आंबा तयार होऊन झाडावरच खराब होऊ लागला आहे. त्यामुळे आंब्याच्या वाहतूक आणि वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी आंबा उत्पादक संघाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली.
Eliminate the problems of mango transportation, distribution system
Eliminate the problems of mango transportation, distribution system

मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे बाजार बंद आहेत. वाहतुकीमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी आंब्याची वाहतूक थांबली आहे. आंबा तयार होऊन झाडावरच खराब होऊ लागला आहे. त्यामुळे आंब्याच्या वाहतूक आणि वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी आंबा उत्पादक संघाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. 

रायगड अलिबागपासून मालवण, देवगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पासूनचा हापूस आंबा आता अगदी तयार झाला आहे. तो बाजारात येण्याच्या प्रतीक्षेत आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे आंब्याचा हंगाम सुरू होऊनही बाजारात आंबा पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे आंबा खवय्यांनाही यावेळी आंब्याचा आस्वाद घेता आलेला नाही. आता एप्रिल आणि मे हे दोन महिनेच हंगाम उरला आहे. त्यातही आंब्याचा व्यवसाय होऊ शकला नाही, तर आंबा उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट येईल. त्यामुळे आंबा बाजारात व्यवस्थित यावा, ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि विक्रीतील अडथळे दूर करावेत, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. 

सर्वांकडील २५ ते ३० टक्के आंबा सध्या तयार आहे. शिवाय हे नाशवंत फळ असल्याने आताच त्याला बाजारात पाठवणे गरजेचे आहे. आंबा राज्यात देशात आणि देशाबाहेरही पाठवला जातो. यातून आंबा उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, सध्या हे सर्व बंद आहे. त्यामुळे अनेकांच्या बागेत आंबा झाडांवर पिकू लागला आहे. त्याला तातडीने बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. 

देशाबाहेर कार्गो वाहतूक सुरू असली, तरीदेखील कंटेनर फ्रेंट स्टेशन अर्थात सीएफएस बंद असल्याने निर्यात वाहतूक शक्य होत नाही. त्यामुळे आंबा पोहोचू शकत नाही. मात्र, यात आंबा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे आणि हे वाहतूक मार्गातील अडथळे दूर करावेत, अशी मागणी केली जात आहे. 

आंबाविक्री मार्गात अनेक अडचणी सध्या आंबाविक्रीसाठी विशेष परवाने देण्याचे काम कृषी विभागाच्या वतीने सुरू आहे. परदेशातही आंबा जावा, यासाठी कृषी पणन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तरी विक्री व्यवस्थेत अनेक अडथळे येत आहेत. वाशीतील घाऊक फळ बाजारातून व्यापारी, दलाल यांच्याकडून सहकार्य मिळत नाही, अशी तक्रार आहे. त्याचबरोबर वाहतुकीसाठी टेम्पो, ट्रक, यांसारख्या वाहनांचा अभाव आहे. त्यातही मिळाला तर वाढीव भाड्यामुळे अडवणूक केली जात असल्याने आंबाविक्री मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com