Agriculture news in marathi On the embankment of the Department of Agriculture in Jalna Response to fertilizer distribution campaigns | Agrowon

जालन्यात कृषी विभागाच्या बांधावर खत वाटप मोहिमेस प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

जालना : गुरुवारी (ता.४) जिल्ह्यातील ६८८ गटांतर्फे १२३५० शेतकऱ्यांना १०.८८ कोटी रुपयांची ६२४५ मेट्रिक टन खते थेट बांधावर पोहच करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. 

जालना : एकाच दिवशी शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पोहच करण्याच्या उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता.४) जिल्ह्यातील ६८८ गटांतर्फे १२३५० शेतकऱ्यांना १०.८८ कोटी रुपयांची ६२४५ मेट्रिक टन खते थेट बांधावर पोहच करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. 

कृषी आयुक्तालयाच्या परिपत्रकानूसार शेतकरी गटांतर्फे शेतकरी गटांतील शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (ता.४) ह्या मोहिमेचा प्रारंभ जालन्याचे आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी एस. डी. गरंडे , अतुल लड्डा, ‘आत्मा’चे दतात्रय सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मातर्फे एकाच दिवशी ५ हजार मेट्रिक टन खताच्या वितरणाची संकल्पना बाळासाहेब शिंदे यांनी मांडली. त्यानुसार गुरुवारी उपक्रम हाती घेण्यात आला. गावामध्ये खतांच्या लिंकद्वारे मागणी नोंदवून कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ,सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक , गावातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या , कृषी मित्रांतर्फे एका दिवसात ५ हजार मेट्रिक टन बांधावर खत वाटप मोहिमेअंतर्गत शेतकरी गटांना ५० मेट्रिक टन युरिया खताचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. 

जास्त खत वाटप करणाऱ्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी गट /शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...