Agriculture news in Marathi Emergency meeting of Shisode Committee today | Page 2 ||| Agrowon

शिसोदे समितीची आज तातडीची बैठक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या शिसोदे चौकशी समितीची बुधवारी (ता. २२) तातडीची बैठक घेतली जात आहे. 

पुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या शिसोदे चौकशी समितीची बुधवारी (ता. २२) तातडीची बैठक घेतली जात आहे. 

कृषी आयुक्त धीरज कुमार स्वतः या समितीच्या चौकशीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. सातारा जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश यापूर्वीच आयुक्तांनी दिले होते. तथापि, गुन्हा दाखल न करता चौकशीचा निर्णय घेण्यात आला. 

‘‘चौकशीसाठी नेलेल्या शिसोदे समितीने नेमका काय अहवाल दिला हे आम्हाला माहीत नाही. मात्र गैरव्यहारातून सुटका करून घेण्यासाठी अधिकारी वर्ग प्रयत्न करतो आहे. त्यामुळे या समितीच्या शिफारशी एक घाव दोन तुकडे करणाऱ्या आहेत, की फौजदारी कारवाई लांबणीवर टाकणारी तजवीज करणाऱ्या आहेत हे स्पष्ट झालेले नाही. मात्र राज्याच्या उपलोकायुक्तांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या समितीच्या अहवालाचा आधार घेऊन अंतिम कारवाई टाळतादेखील येणार नाही,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

दरम्यान, जलयुक्त शिवार घोटाळ्याबाबत थेट कारवाईची गरज असताना मध्येच शिसोदे समिती नियुक्त केल्याने या प्रकरणातील तक्रारदार शेतकरी विलास शंकर यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृषी विभाग नेमक्या कोणाच्या दबावाखाली काम करतो आहे, हा घोटाळा जर फडणवीस सरकारच्या काळात घडला असेल तर कृषी विभागाने स्वतःहून गुन्हा का दाखल केलेला नाही, खुल्या चौकशीला मान्यता न देता संशयास्पद समिती नेमून चालढकल का केली जात आहे, असे सवाल यादव यांनी उपस्थित केले आहेत. 

... तर उच्च न्यायालयात दाद मागणार ः यादव
‘‘कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा मी शोधून काढल्यानंतर कारवाई सोडाच; पण मला बदनाम करण्यासाठी मोहीम उघडली गेली. मात्र मी न घाबरता पाठपुरावा करीत आहे. शिसोदे समिती किंवा कोणत्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्याने घोटाळेबाजांना पाठीशी घातल्याचे पुरावे माझ्या हाती येताच आपण थेट उच्च न्यायालयात दाद मागू,’’ असा निर्धार तक्रारदार शेतकरी विलास शंकर यादव यांनी व्यक्त केला आहे.
 


इतर बातम्या
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...