Agriculture news in Marathi Emergency meeting of Shisode Committee today | Agrowon

शिसोदे समितीची आज तातडीची बैठक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या शिसोदे चौकशी समितीची बुधवारी (ता. २२) तातडीची बैठक घेतली जात आहे. 

पुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या शिसोदे चौकशी समितीची बुधवारी (ता. २२) तातडीची बैठक घेतली जात आहे. 

कृषी आयुक्त धीरज कुमार स्वतः या समितीच्या चौकशीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. सातारा जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश यापूर्वीच आयुक्तांनी दिले होते. तथापि, गुन्हा दाखल न करता चौकशीचा निर्णय घेण्यात आला. 

‘‘चौकशीसाठी नेलेल्या शिसोदे समितीने नेमका काय अहवाल दिला हे आम्हाला माहीत नाही. मात्र गैरव्यहारातून सुटका करून घेण्यासाठी अधिकारी वर्ग प्रयत्न करतो आहे. त्यामुळे या समितीच्या शिफारशी एक घाव दोन तुकडे करणाऱ्या आहेत, की फौजदारी कारवाई लांबणीवर टाकणारी तजवीज करणाऱ्या आहेत हे स्पष्ट झालेले नाही. मात्र राज्याच्या उपलोकायुक्तांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या समितीच्या अहवालाचा आधार घेऊन अंतिम कारवाई टाळतादेखील येणार नाही,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

दरम्यान, जलयुक्त शिवार घोटाळ्याबाबत थेट कारवाईची गरज असताना मध्येच शिसोदे समिती नियुक्त केल्याने या प्रकरणातील तक्रारदार शेतकरी विलास शंकर यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृषी विभाग नेमक्या कोणाच्या दबावाखाली काम करतो आहे, हा घोटाळा जर फडणवीस सरकारच्या काळात घडला असेल तर कृषी विभागाने स्वतःहून गुन्हा का दाखल केलेला नाही, खुल्या चौकशीला मान्यता न देता संशयास्पद समिती नेमून चालढकल का केली जात आहे, असे सवाल यादव यांनी उपस्थित केले आहेत. 

... तर उच्च न्यायालयात दाद मागणार ः यादव
‘‘कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा मी शोधून काढल्यानंतर कारवाई सोडाच; पण मला बदनाम करण्यासाठी मोहीम उघडली गेली. मात्र मी न घाबरता पाठपुरावा करीत आहे. शिसोदे समिती किंवा कोणत्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्याने घोटाळेबाजांना पाठीशी घातल्याचे पुरावे माझ्या हाती येताच आपण थेट उच्च न्यायालयात दाद मागू,’’ असा निर्धार तक्रारदार शेतकरी विलास शंकर यादव यांनी व्यक्त केला आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...