Agriculture news in Marathi Emphasis on development of East India: Prime Minister Modi | Agrowon

पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान मोदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता, तेव्हा भारतीय इतिहासात सुवर्णयुग नोंदविले गेले. केंद्र सरकार या भागाच्या विकासावर जास्तीत जास्त भर देत आहे. कोलकता या विकासाचे नेतृत्व करू शकते, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता, तेव्हा भारतीय इतिहासात सुवर्णयुग नोंदविले गेले. केंद्र सरकार या भागाच्या विकासावर जास्तीत जास्त भर देत आहे. कोलकता या विकासाचे नेतृत्व करू शकते, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. स्वातंत्र्यसैनिक आणि ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओडिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते.

ते यावेळी म्हणाले, की कोलकत्याचा एक व्हायब्रंट शहर म्हणून उदय होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भविष्यावर नजर असलेले व्हायब्रंट कोलकता विकासामध्ये केवळ पश्चिम बंगालचे नव्हे तर संपूर्ण पूर्व भारताचे नेतृत्व करू शकते. विकसनशील पूर्व भारताचे शक्तीकेंद्र म्हणून कोलकत्याचा उदय होण्यासाठी सरकार मदत करेल.

ओडिशासह बिहार, बंगाल, आसाम व ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण पूर्व भारतात अविश्वसनीय नैसर्गिक, मानवी संसाधने आहेत. केंद्र सरकार पायाभूत सुविधा व उद्योगांच्या माध्यमातून या भागातील विकासाची दरी भरून काढण्यावर काम करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओडिशाचा गौरवशाली इतिहास आणि विविधता लोकांपर्यंत पोचली पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘उत्कल केशरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरेकृष्ण महताब यांच्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, की स्वातंत्र्य संग्रामात तुरुंगात जाणाऱ्या व नंतर आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्मीळ राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

पूर्व भारतामुळे देश विकासाची नवी उंची गाठू शकेल. केंद्र सरकार हजारो किलोमीटरचे महामार्ग उभारत आहे. ओडिशात बंदरांना जोडणारे किनारी महामार्ग, शेकडो किलोमीटरचे लोहमार्ग विकसित करण्यात येत आहेत. तेल, वायू आणि पोलाद उद्योगातही गुंतवणूक आणली आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

 


इतर बातम्या
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
माढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोटला पाऊससोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात...
उजनीचे पाणी पळविण्याचा प्रश्न...सोलापूर ः उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याला...
जळगाव जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाला गती...जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप गेल्या...
वार्सा येथे पाणीटंचाईशी पंधरा...वार्सा, जि. धुळे : धज्या आंबापाडा येथील...
बीडमध्ये वादळी पावसाचा दुसऱ्या दिवशीही...बीड : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा...
नांदेड जिल्ह्यात पावसाचा तडाखा सुरुच नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मुक्काम...
‘लिंबोटी’चे पाणी २३ गावांना मिळणारनांदेड : कंधार तसेच लोहा तालुक्यातील संभाव्य...
साताऱ्यात आले लागवडपूर्व कामांना गतीसातारा ः जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या शुभ...
पुणे बाजार समितीमध्ये लसीकरणाला प्रारंभपुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीच्या वतीने...
केवळ जाहिरातींद्वारे कोरोना संपणार नाही...मुंबई ः कोरोना परिस्थिती लक्षात घेता ‘एक देश एक...
कोरोनानंतर ‘कृषी’चा अनुशेष दूर करणार ः...नागपूर : विदर्भातच नाही तर राज्याच्या कृषी...
कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धसकाकोल्हापूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव...
बुलडाण्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांना...बुलडाणा : सातत्याने संकटाचा सामना करणाऱ्या...
कांदा बियाणे भेसळीचा शेतकऱ्यांना फटकाश्रीरामपूर, जि. नगर ः यंदा खरिपात कांदा उत्पादक...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...