Agriculture news in marathi Emphasis on mixed crops to avoid damage | Agrowon

नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

गेल्या वर्षी कपाशीवर आलेली गुलाबी बोंडअळी व सोयाबीनवर आलेला खोडकिड तसेच चक्रीभुंगा याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यामुळे शेतकरी यंदाच्या  खरीप हंगामात नाइलाजाने मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

राळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली गुलाबी बोंडअळी व सोयाबीनवर आलेला खोडकिड तसेच चक्रीभुंगा याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यामुळे शेतकरी यंदाच्या  खरीप हंगामात नाइलाजाने मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे कपाशी. कपाशीचा बेल्ट म्हणूनच हा भाग ओळखला जातो. तालुक्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. पण गेल्या वर्षी कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. उत्पादन खर्च ही निघाला नाही. संपूर्ण शेती घाट्यात गेली. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड बरीच कमी केली आहे. कपाशी नंतर तालुक्यात सोयाबीन पीक घेतले जाते. पण गेल्या वर्षी सोयाबीन पिकावर खोडकीड तसेच चक्रीभुंगा हे रोग आले. तसेच गेल्या वर्षी सोयाबीन पिकाच्या उगवणचीही समस्या होती. याने ही सोयाबीन पिकाचे खूप नुकसान केले.

सोयाबीनचाही उत्पादन खर्च गेल्यावर्षी निघाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनमध्ये रोटावेटर घातले. एकंदरीत गेल्यावर्षी तालुक्यातील दोन्ही मुख्य पिकांनी मागील वीस वर्षांत झाले नसेल इतके नुकसान केले. यामुळेच या वर्षी शेतकऱ्यांना शेतीत  वेगवेगळे प्रयोग करण्यास भाग पाडले आहे.
 गेल्यावर्षी बोंडअळी आल्याने ती या वर्षीही येईल याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे क्षेत्र कमी केले. कपाशीला पर्याय म्हणून शेतकरी शेतात तूर-सोयाबीन तूर-कपाशी, तूर-सोयाबीन-कपाशी, तूर-सोयाबीन या पद्धतीने लागवड करीत आहे एकाच क्षेत्रात विविध पीक शेतकरी घेत आहेत. या वर्षी कुठलेही पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेताना दिसत नाही.

थोडेथोडे सर्वच पीक शेतकरी घेत आहेत. जेणेकरून एखाद्या पिकाने दगाही दिला तरी मोठे नुकसान होणार नाही व दुसऱ्या पिकात ते नुकसान भरून निघेल. एक नाहीतर दुसरे पीक साथ देईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. दुष्काळ, वातावरणातील बदल, नापिकी यामुळे शेतकऱ्यांनी मिश्र पीक पद्धतीचा अंगीकार केला असल्याचे दिसत आहे.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...