Agriculture news in marathi, Emphasis on tourism development of the district through forest parks: Bhujbal | Agrowon

वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर भर : भुजबळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच नैसर्गिक समृद्धीचा वारसा लाभला आहे. देशपातळीवर आदर्श ठरेल, असे निफाड तालुक्यात वनउद्यान वनविभागाने तयार केले. या वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर भर द्यावा’’, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच नैसर्गिक समृद्धीचा वारसा लाभला आहे. देशपातळीवर आदर्श ठरेल, असे निफाड तालुक्यात वनउद्यान वनविभागाने तयार केले. या वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर भर द्यावा’’, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वनविभागाच्या वतीने रविवारी (ता. २४) निफाड येथील वन उद्यान व मानव बिबट सहजीवन केंद्राचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले. आमदार दिलीपराव बनकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, निफाड प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे उपस्थित होत्या.

भुजबळ म्हणाले, ‘‘जंगलक्षेत्र कमी झाले. त्यामुळे वन्यजीवांचे मनुष्य वस्तीकडे स्थलांतर होत आहे. परिणामी, मानव वन्यप्राणी संघर्ष वाढला आहे. तो रोखण्यासाठी मानवाला वन्यप्राण्यांसोबत सहजीवनाची कास धरावी लागेल. नागरिकांना निसर्ग जवळून समजून घेता यावा, भावी पिढीला निसर्गाबाबत अधिक सजगता यावी, या साठी हे उद्यान वरदान ठरेल. जिल्ह्यात वन पर्यटनाचा विकास केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होईल. शालेय जीवनापासूनच वन उद्यानाद्वारे मुलांना शिक्षणाचे धडे द्यावेत. त्यातून वन्यजीव व प्राण्यांबद्दल सहानुभूतीची व संरक्षणाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.’’  

बनकर म्हणले, ‘‘भविष्यात  वन उद्यानाद्वारे मुलांना प्रत्यक्षात वन्य प्राणी व पक्षांची माहिती मिळेल. हे उद्यान भावी पिढीसाठी माहितीपूर्ण आकर्षणाचा बिंदू ठरेल. एक हेक्टरमध्ये उभारलेल्या या उद्यानात विविध सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी रोटन पार्क (सर्प जाती माहिती केंद्र), निफाड मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, ताडोबाचा वाघ, नांदूरमध्यमेश्वर परिसंस्था, ममदापूर राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशीवन, ग्रीनजिम, औषधी वनस्पती व चिल्ड्रन पार्कमध्ये विविध खेळणी बसविण्यात आली आहेत.’’

वन विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
 


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...