जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस. रामामूर्ती

पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने आपल्या गावातील माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृद्‍संधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.
Emphasis on water and soil conservation works: S. Ramamurthy
Emphasis on water and soil conservation works: S. Ramamurthy

बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने आपल्या गावातील माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृद्‍संधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.

पानी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा राबवली जात आहे. सहभागी गावांकरिता मिनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या गावांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार विजेते असलेल्या सिंदखेड (ता. मोताळा) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश लोखंडे, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. ढवळे, जिल्हा परिषद सदस्य निरंजन वाडे, गटविकास अधिकारी श्री. मोहोळ, तालुका कृषी अधिकारी भारत कासार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, की गावाच्या सामूहिक प्रयत्नातून सातत्यपूर्ण काम करीत राहिल्यास मोताळा तालुक्याचा नावलौकिक देशपातळीपर्यंत पोहोचेल. 

उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड या वेळी म्हणाले, की नरेगा योजनेच्या माध्यमातून ‘लखपती कुटुंब समृद्ध कुटुंब’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. नरेगाची कामे करण्याची पद्धत, आता बदलली असून मागेल ते काम देण्याची कार्यपद्धती सध्या ‘रोहयो’मार्फत राबविण्यात येत आहे. 

श्री. लोखंडे म्हणाले, की समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम करीत असलेल्या सर्व गावांची कामगिरी समाधानकारक राहिलेली आहे. तसेच समृद्ध गाव स्पर्धेबरोबरच गावाने गावाची एकी आणि नेकी टिकवून ठेवावी. त्याच्या जोरावर गावाचा विकास करावा. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सिंदखेड गावात पर्जन्यमापक स्थळ, गावाने तयार केलेली गवत नर्सरी, बांधावरील वृक्ष लागवड, सोबतच ६७ एकरावरील वृक्ष व गवत लागवडीची पाहणी केली. संपूर्ण शिवारफेरी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून निरीक्षण केले. सन्मान सोहळ्यामध्ये जयपूर, जनुना, महाळुंगी जहागीर, वारुळी, पोखरी, चिंचपूर, पोहा, तिघ्रा, दाभा, उबाळखेड, शेलापूर खु, चिंचखेड नाथ आणि सिंदखेड या १३ गावांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच पोफळी, लपाली, खामखेड, कोऱ्हाळा बाजार, अंत्री, रिधोरा जहागीर आणि भोरटेक या सात गावांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com