पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटील

नाशिक : ‘‘ स्वतः व आपल्या कुटुंबाच्या पौष्टिक आहाराकडे निट लक्ष द्यावे. घरगुती स्वरूपात परसबाग उभारावी’’, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, मालेगावचे प्रमुख अमित पाटील यांनी केले.
Emphasize on nutritious diet: Patil
Emphasize on nutritious diet: Patil

नाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी दैनंदिन आहार हा संतुलित असावा, यासाठी महिलांना स्वतः व आपल्या कुटुंबाच्या पौष्टिक आहाराकडे निट लक्ष द्यावे. घरगुती स्वरूपात परसबाग उभारावी’’, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, मालेगावचे प्रमुख अमित पाटील यांनी केले.  

कृषि विज्ञान केंद्र मालेगाव, पंचायत समिती मालेगाव आणि एच.एच श्री. श्री. मुरलीधरा स्वामी उद्यानविद्या महाविद्यालय मालेगावतर्फे गुरुवारी (ता.१७) राष्ट्रीय पोषण अभियान-२०२० अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषि विज्ञान केंद्राद्वारे सप्टेंबर महिना पोषण-माह म्हणून साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

कृषि विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ पवन चौधरी, रुपेश खेडकर यांनी मार्गदर्शन केले. महिलांना पोषण मूल्य आधारित परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किटचे वाटप केले. पंचायत समिती सभापती सुवर्णा  देसाई, तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com