‘समृद्धी’चा मुहूर्त पुन्हा हुकला

‘समृद्धी’चा मुहूर्त पुन्हा हुकला
‘समृद्धी’चा मुहूर्त पुन्हा हुकला

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या -पुणे दौऱ्यादरम्यान बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची मुहूर्तमेढ रोवली जाण्याची अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, ती फोल ठरल्याने राज्य सरकारकडून प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी नवीन वर्षात पुन्हा नवीन तारखेचा शोध घेतला जात आहे. 

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समृद्धी प्रकल्प हा राज्यातील दहा जिल्ह्यांना आणि २३ तालुक्यांना जोडतो. ७१० किलोमीटरच्या या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळेच सरकारने आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळेस भूमिपूजनासाठी मुहूर्त शोधला. परंतु, या ना त्या कारणाने तो हुकला. प्रथम पावसाळ्याच्या अगोदर, दुसऱ्यांदा पावसाळ्यानंतर, दिवाळीपूर्वी प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे सांगितले जात होते. परंतु, अपेक्षित जमीन संपादित न झाल्याने भूमिपूजन रखडले.

नोव्हेंबरअखेरच्या आठवड्यात कामाचा प्रारंभासाठी राज्य पातळीवर हालचाली गतिमान झाल्या. मात्र, पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते गुंतल्याने अखेर तेथेही भाजपला माघार घ्यावी लागली.  पंतप्रधान मोदी यांच्या कल्याण दौऱ्याची संधी चालून आल्याने मेट्रो, घरकुल प्रकल्पांसह समृद्धीचा नारळ फोडण्याची तयारी सरकारने केली होती. मात्र, ती संधीही हुकली. 

जानेवारीअखेरच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मे अथवा जूनपर्यंत पुढे ढकलावा लागेल. परिणामी, लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराच्या दृष्टीने समृद्धीसारखा आयता मुद्दा हातचा गमवावा लागेल. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकल्पाचा नारळ फोडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकारने पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून पंतप्रधानांच्या सोयीच्या तारखेचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. या महामार्गासाठी सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com