राहूरी कृषी विद्यापीठात कर्मचारी बदल्यांच्या धास्तीत; वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत

राहूरी कृषी विद्यापीठ
राहूरी कृषी विद्यापीठ

राहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत व बदल्यांच्या धोरणाबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने आग्रही भूमिका घेतली असून, याबाबतचे निवेदन कुलसचिव सोपान कासार यांना दिले आहे.  राज्य शासकीय कर्मचारी व अकृषी विद्यापीठ सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे या कृषी विद्यापीठातील सातव्या वेतन आयोगासोबतच कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना तसेच सुधारीत सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना अद्याप लागू झालेली नाही त्यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.  याबरोबरच विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर सुमारे ३०० हून जास्त कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. सुमारे पन्नास टक्के रिक्त पदे असून ती भरण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर बदल्यांचा सपाटा सुरू केला आहे. मेलवर गुपचूप होणाऱ्या बदल्यांबाबत कमालीची गुप्तता विद्यापीठाच्या प्रशासनाद्वारे पाळण्यात येते, या बदल्यांची माहिती विद्यापीठातील इतर कर्मचाऱ्यांनाही कळत नाही, अनेक बदल्या सोईनुसार रद्दही केल्या जात असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळामध्ये आहे. विद्यापीठ पातळीवर अनेक रिक्त पदे पदोन्नतीने भरता येऊ शकतात, त्यामध्ये दिरंगाई का होत आहे असे समन्वय संघाचे म्हणणे आहे. अशा अनेक कारणांमुळे विद्यापीठातील कर्मचारी, शास्त्रज्ञांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विद्यापीठातील प्राध्यापक संवर्गातील १५० शास्त्रज्ञ व कृषी सहायक पदाच्या १२८ मोठ्या प्रमाणावर उचलबांगडी करण्यात आली आहे.  मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे विद्यापीठातील दहाही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यासोबत प्रशासकीय कामेही ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. बहुतांशी बदल्या झालेले कर्मचारी नव्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत, अनेकांनी नव्या ठिकाणी रुजू होऊन शिल्लक रजा वापरणे सुरू केले आहे.  कर्मचाऱ्यांना बदली झाल्यास बदली प्रवास भत्ता देय होतो. विविध संवर्गातील सुमारे तीनशेहून अधिक बदल्या झाल्यामुळे आता या सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या संवर्गानुसार किमान पंचवीस ते चाळीस हजार रुपयांचे बिल विद्यापीठास द्यावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com