Agriculture news in Marathi, Employees' night to day work for finalist loan waiver lists | Agrowon

कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा रात्रीचा दिवस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने पाठविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी अक्षरश: रात्रीचा दिवस करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. कर्जमाफीच्या याद्या पूर्ण करून त्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत तालुक्‍यातील कृषी विभागाच्या कार्यालयात गडबड सुरू आहे. 

कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने पाठविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी अक्षरश: रात्रीचा दिवस करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. कर्जमाफीच्या याद्या पूर्ण करून त्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत तालुक्‍यातील कृषी विभागाच्या कार्यालयात गडबड सुरू आहे. 

जसा पूर येऊन गेला तसा कृषी विभागावर ताण येण्यास सुरवात झाली. नियमित पंचनाम्याचे सोपस्कर बाजूला ठेवून मोहिम पातळीवर पंचनामे सुरू झाले. महसूल विभागाशी संपर्क साधत हे पंचनामे सुुरू झाले. बऱ्याचदा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने काही प्रमाणात मर्यादा आल्या परंतू गावोगावच्या कृषी सहायकाकडून स्वत:च्या पातळीवर नोंदणी घेण्याच्या सूचनाही कृषी विभागाला करण्यात आल्या. 

यामुळे अनेकदा ‘एकला चलो रे’ची भूमिकाही युद्ध पातळीवर कृषी सहायकांबरोबर अन्य कर्मचाऱ्यांना घ्यावी लागली. द्रुतगतीने पंचनामे करून त्या शासनास दिवाळीपूर्वी देण्यात आल्या. पण त्यानंतर खरी कसरत सुरू झाली. ५८ कॉलमचा फार्म भरुन वेगळ्या याद्या करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. 

यामध्ये शेतकऱ्यांची पूर्ण माहिती, नुकसान झालेले क्षेत्र, एकूण क्षेत्र, पिके आदिंची सविस्तर माहिती घेण्यात आली. या फार्मच्या माध्यमातून कर्जदार बिगर कर्जदार आदिंची माहिती वेगळी करण्याची जबाबदारी आता कृषी विभागाचा ग्राउंड लेव्हलवरचा कर्मचारी करत आहे. हजारो शेतकरी असल्याने हा डाटा एकत्र करण्यासाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. वरिष्ठ पातळीवरुन वेळेत माहिती देण्याचा दबाव असल्याने सकाळी उठल्यापासून रात्री बारा एकपर्यंत जागून या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. 

एखादी माहिती चुकल्यास त्याचा फटका सर्वांनाच बसण्याची शक्‍यता असल्याने डोळ्यात तेल घालून रक्कमांची यादी तयार करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पूर येऊन गेल्यानंतर सातत्याने कामांचा बोजा पडत असल्याने कित्येक दिवस सुट्टी घेऊ शकलो नसल्याची खंत कृषी विभागातील कृषी सहायकांनी व्यक्त केली.


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...