agriculture news in marathi Employees will get incentive grants from Pune ‘ZP’ | Page 2 ||| Agrowon

पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 एप्रिल 2021

पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक, दीड आणि दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर ग्रामसेवक, सरपंच यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे’.’

पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक, दीड आणि दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर ग्रामसेवक, सरपंच यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

कोरोना विषाणूंचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव आणि फैलाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विविध खबरदारी आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरांमधील कोरोना विषाणू ग्रामिण भागात फैलावु नये, यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी धडपडत आहेत. याकाळात त्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने बक्षीस योजना जाहीर केली आहे. 

प्रसाद म्हणाले,‘‘विविध कर्मचाऱ्यांचा गट करून, नागरिकांची आरोग्य तपासणी बरोबरच वैद्यकीय उपचार, लसीकरण सुरु केले आहेत. यासाठी ग्रामपंचायतीमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, संरपंच यांचा सक्रिय सहभाग आहे. या जीवघेण्या संकटात सैनिक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रोत्साहनपर अनुदान योजना पंचायतराज दिनाच्या निमित्ताने जाहीर केली.’’ 

पंधरा दिवसांत ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्‍यांनी कमी केल्यास आणि ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू न झाल्यास दोन हजार रुपये, हेच प्रमाण ६० ते ८० टक्क्यांनी कमी केल्यास दीड हजार आणि ४० ते ६० टक्के कमी केल्यास १ हजार रुपये बक्षिस दिले जाईल,’’, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...