तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय वडेट्टीवार

ब्रम्हपुरी क्षेत्रातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत तीन हजार महिलांना गारमेंट शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय वडेट्टीवार Employment to be given to three thousand women: Vijay Vadettiwar
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय वडेट्टीवार Employment to be given to three thousand women: Vijay Vadettiwar

चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही महिलांचे महत्त्व सांगणारी म्हण आता जुनी झाली असून ‘ज्या कुटुंबांची महिला कमावती, त्या कुटुंबाची होईल प्रगती’ ही म्हण आता लागू झाली आहे. महिलांच्या बचतीवर कुटुंबाचा गाडा चालतो. ब्रम्हपुरी क्षेत्रातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत तीन हजार महिलांना गारमेंट शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होणार असून, त्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाचा आधार बनावे, अशी अपेक्षा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी व्यक्त केली.

ब्रम्हपुरी येथील एन. डी. गारमेंट येथे ॲडव्हान्स गारमेंट मेकिंग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात वडेट्टीवार उद्घघाटक म्हणून बोलत होते. या वेळी कौशल्य विकास नागपूरचे आयुक्त सुनील काळबांडे, नगराध्यक्षा रिता उराडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त भय्याजी येरमे, एन. डी. गारमेंटचे संचालक निलेश गुल्हाने, उद्योग महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.  वडेट्टीवार म्हणाले, ‘‘भविष्यात ‘मेड इन ब्रह्मपुरी’चे वस्त्र सर्व जगात जाऊन ब्रह्मपुरीकरांची मान अभिमानाने उंचावल्या जाईल. ब्रम्हपुरी येथे अद्यावत तयार कपडे निर्मिती करून ते विविध मेट्रो शहरातील प्रमुख बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. गारमेंट शिलाईचा हा प्रकल्प जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील महत्त्वपूर्ण एकमेव प्रकल्प आहे. येथे सर्व प्रकारचे कपडे तयार होणार आहेत. हा प्रकल्प पुढील कालावधीत पाच एकरमध्ये विस्तारित होणार आहे. विकासाबरोबर नागरिकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून, ब्रह्मपुरी विभागात पुढील दोन  वर्षांत किमान दोन हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे.’’  गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून होणाऱ्या सिंचनाचा सर्वाधिक फायदा देखील ब्रह्मपुरी क्षेत्राला होणार आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून उद्योग व्यवसायाला चालन मिळेल. ब्रम्हपुरी क्षेत्रात येत्या काही वर्षांत विविध उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. लवकरच ब्रह्मपुरी उपविभाग उद्योगक्षेत्र म्हणून नावारूपास येईल असेही वडेट्टीवार म्हणाले. कौशल्य विकासातून महिलांना रोजगार देणारा हा उपक्रम कौशल्य विकास विभागातर्फे सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम विदर्भात प्रथमच ब्रम्हपुरी येथे सुरू करण्यात येत आहे. महिलांनी येथे प्रशिक्षण घेवून स्वंयरोजगार सुरू करावा.  -सुनील काळबांडे, उपायुक्त, कौशल्य विकास

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com