Agriculture news in marathi Employment to be given to three thousand women: Vijay Vadettiwar | Agrowon

तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय वडेट्टीवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

ब्रम्हपुरी क्षेत्रातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत तीन हजार महिलांना गारमेंट शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही महिलांचे महत्त्व सांगणारी म्हण आता जुनी झाली असून ‘ज्या कुटुंबांची महिला कमावती, त्या कुटुंबाची होईल प्रगती’ ही म्हण आता लागू झाली आहे. महिलांच्या बचतीवर कुटुंबाचा गाडा चालतो. ब्रम्हपुरी क्षेत्रातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत तीन हजार महिलांना गारमेंट शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होणार असून, त्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाचा आधार बनावे, अशी अपेक्षा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी व्यक्त केली.

ब्रम्हपुरी येथील एन. डी. गारमेंट येथे ॲडव्हान्स गारमेंट मेकिंग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात वडेट्टीवार उद्घघाटक म्हणून बोलत होते. या वेळी कौशल्य विकास नागपूरचे आयुक्त सुनील काळबांडे, नगराध्यक्षा रिता उराडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त भय्याजी येरमे, एन. डी. गारमेंटचे संचालक निलेश गुल्हाने, उद्योग महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. 

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘भविष्यात ‘मेड इन ब्रह्मपुरी’चे वस्त्र सर्व जगात जाऊन ब्रह्मपुरीकरांची मान अभिमानाने उंचावल्या जाईल. ब्रम्हपुरी येथे अद्यावत तयार कपडे निर्मिती करून ते विविध मेट्रो शहरातील प्रमुख बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. गारमेंट शिलाईचा हा प्रकल्प जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील महत्त्वपूर्ण एकमेव प्रकल्प आहे. येथे सर्व प्रकारचे कपडे तयार होणार आहेत. हा प्रकल्प पुढील कालावधीत पाच एकरमध्ये विस्तारित होणार आहे. विकासाबरोबर नागरिकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून, ब्रह्मपुरी विभागात पुढील दोन 
वर्षांत किमान दोन हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे.’’ 

गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून होणाऱ्या सिंचनाचा सर्वाधिक फायदा देखील ब्रह्मपुरी क्षेत्राला होणार आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून उद्योग व्यवसायाला चालन मिळेल. ब्रम्हपुरी क्षेत्रात येत्या काही वर्षांत विविध उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. लवकरच ब्रह्मपुरी उपविभाग उद्योगक्षेत्र म्हणून नावारूपास येईल असेही वडेट्टीवार म्हणाले.
कौशल्य विकासातून महिलांना रोजगार देणारा हा उपक्रम कौशल्य विकास विभागातर्फे सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम विदर्भात प्रथमच ब्रम्हपुरी येथे सुरू करण्यात येत आहे. महिलांनी येथे प्रशिक्षण घेवून स्वंयरोजगार सुरू करावा. 
-सुनील काळबांडे, उपायुक्त, कौशल्य विकास


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...