नगर जिल्ह्यात नरेगा कामांवर ६७७६ मजूर कार्यरत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन मजुरांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामपंचायत आणि अन्य यंत्रणांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात १८४४ कामे सुरू असून त्या कामांवर ६७७६ मजूर कार्यरत असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. जिल्हाभरातील दुष्काळी स्थिती पाहता कामांवरील मजुरांची संख्या मात्र अल्प आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करताना मजुरांना रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) योजनेतून सिंचन विहिरी, फळबाग लागवड, वृक्ष लागवड आदिंसह अन्य वैयक्तिक लाभाची कामे उपलब्ध करून दिली जातात. मजुरांनी कामांची मागणी केल्यानंतर त्यांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना नेते आणि प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

मात्र सध्या जिल्हाभर दुष्काळ असतानाही कामांवर फारसे मजूर असल्याचे दिसत नाही. सध्या ग्रामपचंयातींची १३३४ कामे सुरू असून त्या कामांवर ३६०६ मजूर आहेत, तर अन्य यंत्रणांची ५१० कामे सुरू असून त्याकामांवर ३१६९ मजूर अशी चौदा तालुक्‍यांत सध्या १८४४ कामे सुरू असून त्या कामांवर ६७७६ मजूर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.  

तालुकानिहाय सुरू असलेली कामे (कंसात मजुर) :  अकोले ः १५४ (४३५),  जामखेड ः १७३ (७२३), कर्जत ः १२७ (४८०),  कोपरगाव ः १२५ (२३८),  नगर ः १०५ (५७६),  नेवासा ः ९७ (४४३), पारनेर ः १३७ (५६९), पाथर्डी ः १३१ (५८२), राहाता ः ८० (२८५)   राहुरी ः २०३ (३५१), संगमनेर ः १४१ (५८८),शेवगाव ः ९८ (७१८), श्रीगोंदा ः ८९ (४२९) ,श्रीरामपूर ः १८४ (३६०)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com