नगर जिल्ह्यात ‘रोहयो’कामांवर ५७५३ मजूर कार्यरत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर :  ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेतीकामांना सुरुवात झाली आहे. याशिवाय रोजगार हमी योजनेच्या कामांनाही प्रारंभ झाला आहे. सध्या ‘रोहयो’च्या कामांवर मजुरांची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत १३१० कामे सुरू असून या कामांवर ५ हजार ७५३ मजूर कार्यरत आहेत. 

गेल्या वर्षी अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. दुष्काळाची तीव्रता वाढायला लागल्याने मार्च महिन्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामावरील मजुरांची संख्या तब्बल १८ हजारांपर्यंत गेली होती. यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला.

ऑगस्टच्या सुरुवातीला १५ दिवसांतच जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास शंभर टक्के भरली. त्यामुळे काही प्रमाणात रोजगार हमीची कामे थांबल्याचे दिसून आले. मात्र, मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला. त्यामुळे शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता शेतीची व रोजगार हमी योजनेतील कामांना सुरुवात झाली असून ‘रोहयो’च्या कामांवर मजुरांची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत १३१० कामे सुरू आहेत. जिल्हाभरातील कामांवर ५ हजार ७५३ काम करत आहेत. 

तालुकानिहाय कामे व कंसात मजूर संख्या : अकोले ८३ (२७४), कर्जत ९४ (३१२), कोपरगाव ९९ (२१७), नगर ८६ (४०८), नेवासा ६७ (३५२), पारनेर ९२ (५५१) श्रीरामपूर ५१ (१९३), राहता ७७ (३१०), राहुरी ७३ (२०६), संगमनेर ११६ (४७७), शेवगाव ११५ (५७०), श्रीगोंदा १३३ (५०८), पाथर्डी ११२ (३९५), जामखेड २५२ (९८०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com