ड्रोनच्या तंत्रज्ञानामध्ये कृषी पदवीधरांना रोजगाराच्या संधी ः डॉ. फरांदे

ड्रोनच्या तंत्रज्ञानामध्ये कृषी पदवीधरांना रोजगाराच्या संधी ः डॉ. फरांदे
ड्रोनच्या तंत्रज्ञानामध्ये कृषी पदवीधरांना रोजगाराच्या संधी ः डॉ. फरांदे

पुणे ः शेतीक्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हळूहळू वाढू लागला आहे. त्याचे फायदे शेतकऱ्यांना दिसून येत आहेत. यामुळे आगामी काळात कृषी पदवीधरांना ड्रोनच्या संशोधनात आणि निर्मिती क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक फरांदे यांनी व्यक्त केले. 

भारतीय कृषी संशोधन परिषद, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब’ याविषयी कार्यशाळा शुक्रवारी (ता. १) आयोजित केली होती. त्या वेळी श्री. फरांदे बोलत होते. या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, राहुरीतील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवर, अभियंता अतुल चौधरी, उद्योजक डॉ. किशोर गोरे आदी उपस्थित होते.   

श्री. फरांदे म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध प्रयोग केले जात आहे. या ड्रोन तंत्रज्ञानामुळे जमीन, विविध पिके, पिकाला द्यावयाचे पाणी, खते, कीटक व रोग याविषयीची मूलभूत माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. आगामी काळात या तंत्रज्ञानाचा वापर अधिक होणार असून त्याचा शेती व शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल. त्यामुळे कृषी पदवीधरांनी यातील संधी ओळखून याकडे वळण्याची गरज आहे.’’ अभियंता अतुल चौधरी म्हणाले की,``सध्या शेती क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कमी प्रमाणात होत असला तरी पुढील काळात याचा वापर आणखी वाढणार आहे. या ड्रोन तंत्रज्ञानामुळे पिकाखालील क्षेत्र, निविष्ठाचा वापर व पिकांची देखरेख करणे या बाबी आणखी सुलभ होणार आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान म्हणजे भविष्यातील शेतीला वरदान ठरणार आहे.’’ 

या वेळी प्रकल्प सहसमन्वयक डॉ. जयश्री पाचपुते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन डिंगरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रशांत बोडखे यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com