रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला, कुक्कुटपालनासह मास्कनिर्मितीतून रोजगार

बँकेमार्फत या गटांना १५७ कोटी ३६ लाख कर्ज दिले आहे त्यातून उभारलेल्या व्यवसायामुळे कोविड काळात बचत गटांना उत्पन्नाचे साधन मिळाले. - नितीन माने, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
 Employment through mask making including vegetables and poultry in Ratnagiri district
Employment through mask making including vegetables and poultry in Ratnagiri district

रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी भाजीपाला लागवड, कुक्कुटपालनासह मास्क बनविण्याच्या उद्योगातून मार्च ते जुनपर्यंतच्या तीन महिन्यात दीड कोटी रुपयांची उलाढाल केली. त्यातून त्यांच्या रोजगाराची सोय झाली.

जिल्ह्यातील उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनातर्गत कार्यरत महिला, महिला समुह, समुदाय संसधान व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. उमेदअंतर्गत जिल्ह्यात १५,९१९ स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना झाली . या बचत गटांना १४ कोटी ४९ लाख ५२ हजार रुपयांचे खेळते भांडवल वाटप करण्यात आले. 

कोरोनापासून सुरक्षिततेसाठी मास्कला मोठी मागणी होती. परराज्यातून मास्क मागवणे कठीण होते. त्यासाठी स्थानिक बचत गटांनी मास्क बनवण्याचा निर्णय घेतला. त्यातून स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध झाला. जिल्ह्यात ३४० समूहातील २२७० सदस्य टेलरिंग व्यवसायाशी निगडित आहेत. त्यांनी ३ लाख ५८ हजार ३४५ मास्क बनवले. त्यातून ६८ लाख ८१ हजार ६८२ चा व्यवसाय केला.

गावातल्या गावात भाजी विक्रीचे स्टॉल उभारून जिल्ह्यातील ८४७ गटांतील १६१७ सदस्यांनी भाजीपाला व्यवसाय केला. ९१ हजार ७३८ टन भाजीपाला विक्रीतून ३९ लाख ४९ हजार ७४४ रुपये उत्पन्न मिळवले. कुक्कुटपालन व्यवसायात जिल्ह्यातील ७२७ समूहातील ११३७ सदस्य सहभागी झाले होते. त्यातून ४८ लाखाचे उत्पन्न मिळाले. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्याने रत्नागिरी, संगमेश्‍वर, लांजा या तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सेंद्रिय शेती, लोकल गट, उत्पादक गट, उत्पादक कंपनी स्थापन करुन अभियानातील कुटूंबांना पाठबळ देण्यात येत आहे.

कोविड १९ च्या टाळेबंदी कालावधीत बचत गटांच्या प्रमुख महिलांनी कोविड योध्याची भुमिकाही बजावली. गटांचे बचतीचे व कर्ज हप्ते घरोघरी जाऊन जमा करुन बँकेत भरणा केला. गरजू ‍कुटुंबास पैसे उपलब्ध करून दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com