रोजगारासाठी जॉब कार्डसह प्रशिक्षणही ः बोंडे

रोजगारासाठी जॉब कार्डसह प्रशिक्षणही ः बोंडे
रोजगारासाठी जॉब कार्डसह प्रशिक्षणही ः बोंडे

अमरावती : रोजगार मिळवून देणाऱ्या जॉबकार्डसह नोकरी मिळण्यासाठी आवश्यक तयारी, मुलाखत तंत्र आदी प्रशिक्षणही उपलब्ध करून देऊ, असे कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. १२) मोर्शी येथे सांगितले. मोर्शी येथे ग्रामीण भागातील युवक-युवतींकरिता जॉबकार्ड वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. मातोश्री त्रिवेणी सूतगिरणी सहकारी संस्थांचे अध्यक्षा सौ. वसुधाताई बोंडे, राम सातपुते आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. बोंडे म्हणाले की, जॉबकार्ड १० वी पास अथवा नापास व पदवीधर अशा सर्व ग्रामीण भागातील युवक- युवतींना दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल. श्रीमती बोंडे म्हणाल्या की, जॉबकार्ड कार्यक्रमात प्रथमतः एक फॉर्मद्वारे माहिती भरून घेण्यात येणार आहे. एकूण ३५६ कंपन्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता वाचून अर्हतेनुसार रोजगाराबाबत संदेश उमेदवारांना पाठवतील, युवकांनी अपेक्षित असलेल्या कंपनीच्या संदेशाला प्रतिसाद द्यावा आणि त्यानंतर मुलाखतीची तारीख वेळ व ठिकाण कळविण्यात येईल. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात कार्ड वितरण झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com