Agriculture news in marathi Employment for the youth of the village through sale of commodities in Panderkwada | Agrowon

पांढरकवडा येथील शेतमाल विक्रीतून गावातील युवकांनाही रोजगार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 एप्रिल 2020

पाच एकरावर टरबूज लागवड केली आहे. व्यापारी दोन, तीन रुपये किलोने मागणी करीत होते. आता थेट दहा रुपये किलोने टरबूज विकला जात आहे. दररोज सरासरी २० किलोमीटरपर्यंत जाणे शक्‍य होते. वाहनधारकाला देखील काम मिळाले आणि आमचा शेतमाल विकला गेला. 
- हिमांशू राजूरकर, खैरगाव देशमुख, पांढरकवडा, यवतमाळ 

यवतमाळ : इच्छा तिथे मार्ग असतोच, हे सिध्द करीत खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा) येथील शेतकऱ्यांनी नाशवंत असलेल्या कलींगड विक्रीसाठी अभिनव पॅटर्न राबविला आहे. त्याव्दारे शेतकऱ्यांच्या मालविक्री सोबतच गावात छोटे मालवाहू वाहनधारक युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे. 

तेलंगणाच्या सीमेवर असलेला पांढरकवडा तालुक्‍यातील खैरगाव देशमुख हा दुर्गम भाग. नागपूरसारख्या मोठ्या बाजारपेठेत माल पाठविण्यासाठी येथील शेतकऱ्यांना तासनतास लागतात. त्यामुळे स्थानिक स्तरावरच शेतमालाची विक्री केली जाते. सिंचनाच्या सोयी असल्याने नगदी पिके घेण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल आहे. खैरगावमध्ये दरवर्षी कलिंगडाची लागवड होते. व्यापारी थेट सात ते आठ रुपये किलोने कलिंगड घेतात. 

यंदा तब्बल ७० एकरांवर शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली. फळे परिपक्‍व झाल्यानंतर विक्रीवेळी मात्र लॉकडाऊनचे कारण देत व्यापाऱ्यांनी अवघ्या दोन ते तीन रुपये किलोने कलींगडाची मागणी केली. उत्पादकता खर्चही यातून निघणे शक्‍य नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यास माल देण्यास नकार दिला. त्यांनतर शेतकऱ्यांना गावातीलच वाहतूकदारांच्या माध्यमातून पर्याय सापडला.

गावात भाजीपाला व किराणा वाहतूकीसाठी सात ते आठ छोटे मालवाहू वाहने आहेत. त्यांच्यासमोर थेट कलिंगड विक्रीचा पर्याय मांडण्यात आला. वाहनधारकांनीच कलिंगडाची विक्री करावी. सहा रुपये किलोने त्यांना शेतकरी फळे देतील. त्यांनी ती दहा रुपये किलोने विकावी. विक्री झाल्यावर सायंकळी चार रुपये वाहनधारकाला, तर सहा रुपये शेतकऱ्याला दयावे, असे ठरले. 

गावोगावी मिळतोय ग्राहकांचा प्रतिसाद 

सध्या एका वाहनाधारकांकडून सरासरी १७ क्‍विंटलची विक्री गावोगावी होत आहे. पांढरकवडा तहसीलदार तसेच पांढरकवडा तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने यांनी या विक्री व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले. त्यामुळेच हा पॅटर्न यशस्वी होऊ शकला, अशी माहिती शेतकरी प्रकाश पुप्पलवार यांनी दिली. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...