बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बूथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहननाना पटोले यांनी केले.
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले Enable Booth Committees: Nana Patole
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले Enable Booth Committees: Nana Patole

मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचविला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बूथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.    

यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी (ता. २६) पार पडली. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पटोले म्हणाले, ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबविली.

अवकाळीचे नुकसान होताच दहा हजार कोटी रुपयांची मदत दिली. मागील भाजप सरकारपेक्षा जास्त मदत अवघ्या एका वर्षात केली आहे. सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावा-गावांत पोहोचविण्याचे काम करा.’’  काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे.

काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. देशभरातून नरेंद्र मोदीची हवा आता संपली असून, काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपचा बालेकिल्लाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला आहे.

पुण्याची जागाही काँग्रेसने जिंकली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. लोकांचा हा विश्वास कायम ठेवून जोमाने काम केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अधिक सोपा होईल, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com