Agriculture news in marathi Enable Booth Committees: Nana Patole | Page 2 ||| Agrowon

बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बूथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.   

मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचविला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बूथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.   

यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी (ता. २६) पार पडली. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पटोले म्हणाले, ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबविली.

अवकाळीचे नुकसान होताच दहा हजार कोटी रुपयांची मदत दिली. मागील भाजप सरकारपेक्षा जास्त मदत अवघ्या एका वर्षात केली आहे. सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावा-गावांत पोहोचविण्याचे काम करा.’’ 
काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे.

काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. देशभरातून नरेंद्र मोदीची हवा आता संपली असून, काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपचा बालेकिल्लाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला आहे.

पुण्याची जागाही काँग्रेसने जिंकली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. लोकांचा हा विश्वास कायम ठेवून जोमाने काम केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अधिक सोपा होईल, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...