agriculture news in marathi, enam review meeting, pune, maharashtra | Agrowon

‘ई -नाम’अंतर्गत पाच राज्यांमध्ये आंतरराज्य व्यापार सुरू करणार : पी. के. स्वाईन

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पुणे  : आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत (ई - नाम) महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आंतरराज्य व्यापार (इंटरस्टेट ई-ट्रेड) सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव पी. के. स्वाइन यांनी दिली. याअनुषंगाने राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांचे सचिव आणि व्यापाऱ्यांना त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. 

पुणे  : आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत (ई - नाम) महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आंतरराज्य व्यापार (इंटरस्टेट ई-ट्रेड) सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव पी. के. स्वाइन यांनी दिली. याअनुषंगाने राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांचे सचिव आणि व्यापाऱ्यांना त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. 

ई-नाम अंतर्गत इंटरस्टेट ई-ट्रेडला चालना देण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळामध्ये नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी आंतरराज्य व्यापाराबाबत पी. के. स्वाइन यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व तमिळनाडू या राज्यांच्या पणन विभागाचे अधिकाऱ्यांसह राज्यातील ई-नाममध्ये निवड झालेल्या महत्त्वाच्या बाजार समित्यांचे सचिव व व्यापारी उपस्थित होते.  

या वेळी श्री. स्वाइन म्हणाले, की केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेची राज्यातील ६० बाजार समित्यांमध्ये अंमलबजावणी सुरू आहे. ई-नामची अंमलबजावणी इंट्रामंडी (बाजार समिती स्तरावर), इंटरमंडी (राज्यातील २ बाजार समित्या) व इंटरस्टेट (दोन राज्यातील बाजार समित्या) या तीन स्तरांमध्ये विभागण्यात आली आहे. लवकरच राज्यातील बाजार समित्यांची आंतरराज्य ई व्यापाराला चालना देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

प्रधान सचिव अनुपकुमार म्हणाले, की ई - नाम अंतर्गत होणारा व्यापार हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामाध्यमातून शेतीमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या व्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून याची अंमलबजावणी करावी. या वेळी पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, आंध्र प्रदेशचे पणन विशेष आयुक्त श्री. प्रद्युम्न, तेलंगणाच्या पणन संचालक श्रीमती लक्ष्मीबाई यांनी इंटरस्टेट ई-ट्रेडच्या अनुषंगाने आपपल्या राज्यातील बाजार समिती कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली. या वेळी सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. दीपक शिंदे यांनी आभार मानले. 

मुंबई, पुण्यातील कामकाज असमाधानकारक 
‘ई - नाम’ अंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांचे कामकाज अत्यंत असमाधानकारक असल्याबाबत केंद्रीय सहसचिव पी. के. स्वाइन यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, खामगाव, गोंदिया, हिंगोली व सेनगाव येथील बाजार समित्यांचे कामकाज असमाधानकारक असल्याने स्वाइन यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे, मुंबईसारख्या महत्त्वाच्या बाजार समित्यांवर प्रशासक असून, देखील या बाजार समित्यांमध्ये ई नामची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मुंबई बाजार समितीवर खुद्द सहकार आयुक्त सतीश सोनी प्रशासक आहेत. पुणे बाजार समितीवर अप्पर निबंधक दर्जाचे अधिकारी बी. जे. देशमुख प्रशासक आहेत. देशमुख हे बाजार व्यवस्थेमध्ये रस असणारे अधिकारी असून, ते देखील ई नामच्या अंमलबजावणीबाबत अपयशी ठरल्याचे चित्र आहे. 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...
सांगलीत शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणारसांगली : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम...