Agriculture news in marathi, The encampments are closed, though the animals are on the spot | Agrowon

माणमध्ये छावण्या बंद, तरी जनावरे जागेवरच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

दहिवडी, जि. सातारा : चारा छावण्या सुरू ठेवण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. मात्र, माणमध्ये अजून २५ चारा छावण्या सुरूच आहेत. यातील काही चारा छावण्याचालकांच्या करामती समोर येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी छावणीचालकांनी गेल्या महिन्यापासून पेंड दिली नाही. ऊसही निम्माच देऊन नुसत्याच सह्या घेतल्याने पशुपालकांनी छावण्या बंद होऊनही छावणीवरून जनावरे हालवली नाहीत. ‘ऊस अन्‌ पेंड द्या मग आम्ही जातो,'' अशी मागणी पशुपालक करत आहेत. त्यामुळे संबंधित छावणीचालकांची बिले कापून प्रशासन कारवाई करणार, की त्यांना पाठीशी घालणार? याकडे पशुपालकांच्या नजरा लागल्या आहेत. 

दहिवडी, जि. सातारा : चारा छावण्या सुरू ठेवण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. मात्र, माणमध्ये अजून २५ चारा छावण्या सुरूच आहेत. यातील काही चारा छावण्याचालकांच्या करामती समोर येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी छावणीचालकांनी गेल्या महिन्यापासून पेंड दिली नाही. ऊसही निम्माच देऊन नुसत्याच सह्या घेतल्याने पशुपालकांनी छावण्या बंद होऊनही छावणीवरून जनावरे हालवली नाहीत. ‘ऊस अन्‌ पेंड द्या मग आम्ही जातो,'' अशी मागणी पशुपालक करत आहेत. त्यामुळे संबंधित छावणीचालकांची बिले कापून प्रशासन कारवाई करणार, की त्यांना पाठीशी घालणार? याकडे पशुपालकांच्या नजरा लागल्या आहेत. 

पुढे मुदतवाढ मिळाली नसल्याने छावण्या सुरू राहण्याच्या आशा मावळल्या आहेत. मात्र, असे असले तरी पुरेसा चारा उपलब्ध झाला नसल्याचे कारण देत तब्बल २५ चारा छावण्या अजून सुरू आहेत. चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरास १८ किलो व लहान जनावरास नऊ किलो ओला चारा व प्रती जनावर दररोज अर्धा किलो पेंड देण्याचा शासन निर्णय होता. मात्र, काही छावणीचालकांनी सुरवातीपासूनच चारा कुट्टी करून १८ ऐवजी १५ किलोच दिली. तर काही छावणीचालकांनी मागील काही दिवसांत विविध कारणे देत निम्माच चारा दिला. काही ठिकाणी पेंड दिलीच नाही. मात्र, पशुपालकांकडून चारावाटप रजिस्टरला चारा व पेंड मिळाल्याच्या सह्या घेतल्या आणि चारा नंतर देऊ, असे सांगून वेळ मारून नेली.

 बहुतांशी चारा छावण्या बंद झाल्याने पशुपालकांनी सह्या घेतलेला चारा मिळावा, अशी मागणी केली आहे. संबंधित पशुपालकांनी प्रशासनाकडे वस्तुस्थिती सांगितल्यानंतर तलाठी येऊन गेले. मात्र, त्यांनीही छावणीचालकांची पाठराखण करून पशुपालकांच्या तक्रारीकडे डोळेझाक केली. काही छावणीचालकांनी पशुपालकांना तुम्हाला चारा देण्यात येईल; पण खरी माहिती प्रशासनास सांगू नका. अन्यथा, छावण्या बंद होतील, असे सांगितले आहे.

या आश्वासनामुळे पशुपालकांनीही सह्या केलेला हक्काचा चारा मिळाल्याशिवाय चारा छावणीतून न हलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन याची गंभीर दखल घेऊन पशुपालकांना न्याय देणार का? चारा छावणीचालकांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...