नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ. विश्वनाथा
कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर करावा. गांडूळ खतासारख्या सेंद्रिय खताची निर्मिती व विक्री हा एक चांगला कृषी पूरक उद्योग होऊ शकतो’’, असे प्रतिपादन राहुरी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विश्वनाथा यांनी येथे केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, अटारी, (पुणे) व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेतर्फे तीनदिवसीय गळीत धान्य व कडधान्ये पिकातील समूह आद्यरेखा प्रात्याक्षिके संबंधित कार्यशाळा सुरू आहे. त्याचे उद्घाटन डॉ. विश्वनाथा यांच्या हस्ते झाले.

अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या कडधान्य व गळीतधान्य या आद्यरेखा प्रात्याक्षिक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कृषी विज्ञान केंद्रांनी ही प्रात्याक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करावेत.’’
डॉ. अनिल गुप्ता यांनी संस्थेमार्फत चालणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संजय डी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, आमदार ऋतूराज पाटील यांची भाषणे झाली. डॉ. अशोक पिसाळ, डॉ. विश्वनाथ भोसले, श्रीलेखा साटम, डॉ. क्षमा कुल्हाली आदी उपस्थित होते.
- 1 of 1024
- ››