संशोधनातून शेतकऱ्यांना डिजिटल शेतीसाठी प्रोत्साहित करा : डॉ. के. पी. विश्वनाथ

‘‘विविध विषयातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून अजैविक ताण सहन करणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा : कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा
  Encourage farmers for digital farming through research: Dr. K. P. Vishwanath
Encourage farmers for digital farming through research: Dr. K. P. Vishwanath

परभणी : ‘‘विविध विषयातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून अजैविक ताण सहन करणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. नवनिर्मित संशोधन करून शेतकऱ्यांना डिजिटल शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे’’, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत सोमवार (ता.१९) ते शुक्रवार (ता.३) या कालावधित आयोजित डिजिटल साधनांद्वारे ‘पिकांचे अजैविक ताण व्यवस्थापन’ या विषयावरील ऑनलाइन प्रशिक्षण झाले. त्याच्या समारोपप्रसंगी डॉ. विश्वनाथा बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, भारतीय कृषी संशोधन परिषदेतील वनस्पती शरीरक्रियाशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. व्ही. चिन्नूसामी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. गोदावरी पवार आदी सहभागी झाले होते.

डॉ. ढवण म्‍हणाले, ‘‘अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मिती करत असताना अजैविक ताण सहन करणाऱ्या घटकांचा समावेश संशोधनात करावा. राज्‍यातील कृषी शास्त्रज्ञांनी राज्यस्तरावर संशोधनाची दिशा ठरवून अभ्यास करावा.’’

प्रशिक्षणात भारत, अमेरिका, जपान, ब्राझील, नेपाळ, पाकिस्तान, पोर्तुगाल, फिलिपिन्स, व्हिएतनाम, नायजेरिया व अन्य देश येथून संशोधक, प्राध्यापक व आचार्य असे एकूण ५०० प्रशिक्षणार्थी सहभागी होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com