शेतकऱ्यांना दुबार पिकांसाठी प्रोत्साहीत करा ः मंत्री सुनील केदार 

वर्धा ः कोरोनामुळे शेतकऱ्यांची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. याची दखल घेत शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी लवकर येणारे वाण बाजारात उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना त्याकरिता प्रोत्साहीत करावे, अशा सूचना दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
Encourage farmers for double cropping: Minister Sunil Kedar
Encourage farmers for double cropping: Minister Sunil Kedar

वर्धा ः कोरोनामुळे शेतकऱ्यांची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. याची दखल घेत शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी लवकर येणारे वाण बाजारात उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना त्याकरिता प्रोत्साहीत करावे, अशा सूचना दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप पीक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार पंकज भोयर, रणजित कांबळे, समीर कुणावर, दादाराव केचे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबसे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे उपस्थित होते. 

मंत्री केदार म्हणाले की, शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी याकरिता सिंचन सुविधा बळकट करणे गरजेचे आहे. त्याकरिता सिंचन विभागाने आराखडा तयार करावा. संबंधित शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच सिंचन सुविधा नसणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर येणाऱ्या वाणाच्या लागवडीस प्रोत्साहित करून हरभरा व गव्हाचे पीक घेण्यासाठी मार्गदर्शन करावे. पीक पद्धती बदलाचा प्रसार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांची समिती गठीत करावी. 

पीककर्जासाठी हेल्पलाईन  पीककर्ज घेतांना शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदाराच्या नियंत्रणात हेल्पलाईन तयार करावी. त्यावरील तक्रारींचे निरसन करण्यात यावे. पीकविमा जी कंपनी काढणार त्या कंपनीचा जिल्हा व प्रत्येक तालुक्‍याला प्रतिनिधी कुठे बसणार याची लेखी माहिती दिल्याशिवाय कोणत्याही कंपनीला विमा काढण्याचे अधिकार देऊ नयेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com