agriculture news in marathi, Encourage tribal farmers from groups of two villages in Akole | Agrowon

अकोलेतील दोन गावांत गटशेतीतून आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

आदिवासी शेतकऱ्यांच्या गटशेतीस प्रोत्साहन योजनेतून प्राधान्य दिले आहे. सहभागी दोन्ही शेतकरी गटांना टॅंकरसह अन्य अवजाराचा पुरवठा केला आहे. गरजेनुसार पाॅलिहाउस व शेडनेट केले जात आहे. त्यासाठी कृषी विभाग अनुदान देत आहे. उत्पादत केलेल्या मालाचा पुरवठा करण्यासाठी करार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित आणि हक्काचे भाजीपाला पुरवठा ठिकाण उपलब्ध होईल.  
- सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर (जि. नगर)

नगर : आदिवासी भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे विक्री ठिकाणी उपलब्ध होण्यासह दर्जेदार माल उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोले तालुक्यातील म्हाळुंगी व वीरगाव-गणोरे येथे गटशेतीसाठी दोन शेतकरी गट केले आहेत. त्यात सुमारे ९५ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांना शेडनेट, पाॅलिहाउस उभारून देण्यात येत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आश्रमशाळा, सैन्य विभागाशी करार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. 

शेतीमधील उत्पादनासोबत उत्पन्न दुप्पट करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार या गावांत गटशेती अधिक सक्षम करण्याचे नियोजन आहे. म्हाळुंगीच्या शेती गटात ५७, तर वीरगाव-गणोरेच्या गटात ३७ शेतकरी सहभागी झाले आहेत. म्हाळुंगीमधील बहूतांश शेतकरी आदिवासी आहेत. तेथे ३२ शेतकऱ्यांना, तर वीरगाव- गणोरेत २९ शेतकऱ्यांना पाॅलिहाउस, शेडनेट उभे करून दिले जात आहेत. त्यातील १५ कामे पूर्ण झाली आहेत. दोन्ही गावांच्या गटातील शेतकरी भाजीपाला उत्पादित करत आहेत. 

अकोले तालुक्यात आदिवासी आश्रमशाळा आहेत. म्हाळुंगीच्या गटाने त्या शाळांना भाजीपाला पुरवठा करण्याबाबत करार केला आहे. वीरगाव- गणोरेचे शेतकरी पूर्वीपासूनच भाजीपाला पिकवून मुंबईला पुरवठा करतात. त्यात अधिक दर्जेदारपणा यावा, हा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. हा भाजीपाला पुरवठा करण्यासंदर्भात औरंगाबाद, नगरमध्ये सैन्य दलाशी करार केला जाणार आहे. जिल्ह्यात आदिवासी भागात असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे. 

टॅक्ट्ररसह अवजारांचा पुरवठा 

शेतीचे कष्ट कमी व्हावेत, मजूर टंचाईवर मात करता यावी, म्हाळुंगी व वीरगाव- गणोरे येथील शेतकरी गटांना गटशेतीस प्रोत्साहन योजनेतून एक टॅक्ट्रर व पाच टॅक्ट्ररचलित औजारे  दिली आहेत. गटाबाहेरील शेतकऱ्यांनाही भाडेतत्त्वावर अवजारे दिली जातात. त्यातून आलेल्या पैशातून अवजाराची देखभाल होण्याला मदत होते.   


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...