पुणे बाजार समिती आवारात अतिक्रमणे वाढली

गणपती मंदिरालगत झालेल्या पक्क्या बांधकामाबाबत माहिती नाही. याबाबती माहिती घेऊन अतिक्रमण काढले जाईल. - बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे बाजार समिती
पुणे बाजारसमितीतील अतिक्रमण
पुणे बाजारसमितीतील अतिक्रमण

पुणे  ः राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समित्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी जोर धरला आहे. ही अतिक्रमणे प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा अडतदारांमध्ये सुरू असून, वाढत्या अतिक्रमणांना वेळीच आवर घालून झालेली अतिक्रमणे हटविण्याची मागणी अडतदार करत आहेत. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस शेतीमालाची आवक वाढत असून, शेतीमाल उतरविण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. त्यातच काही अडते आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्रमण करून जागा बळकावण्यात आल्या आहेत. याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अडतदारांनी केला आहे.

प्रशासकीय संचालक मंडळ असताना, काही संचालकांनी आर्थिक व्यवहारातून टपऱ्या टाकल्या होत्या. मात्र माध्यमांनी या टपऱ्यांच्या अतिक्रमणांवर प्रकाश टाकल्यानंतर या टपऱ्या काढण्यात आल्या. मात्र आता प्रशासकीय राजवट असून, गणपती मंदिरालगत पक्के बांधकाम करून, कॅन्टीनवजा हॉटेल थाटण्यात आले आहे. यासाठी पाण्याचा जोडदेखील देण्यात आला असून, हे कॅन्टीन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? याबाबत बाजार आवारात चर्चा सुरू आहे. 

गणपती मंदिरात ज्येष्ठ आडतदार, बाजार समितीचे अधिकारी, अडते असोसिएशनचे पदाधिकारी यांचा नियमित राबता असतो. मात्र तरीही याबाबत साधी तक्रारदेखील प्रशासनाकडे झालेली नसल्याचे समोर येत आहे.  

झालेल्या पक्क्या बांधकामांबाबत अतिक्रमण विभागप्रमुखच अनभिज्ञ असून, या बांधकामांबाबत संबधित अधिकारी, अडत्यांकडे याबाबत विचारपसू करत असल्याचीदेखील माहिती समोर येत आहे.  बाजार समितीमधील वाहतूक कोंडीमुळे आम्ही वैतागलो आहोत. मात्र ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असताना, वाहतुकीला अडथळा निर्माण होणारी पक्की अतिक्रमणे होत असतील तर हे चुकीचे आहे. आम्ही असोसिएशन म्हणून माहिती घेऊन, याबाबत प्रशासनाकडे तक्रार करू, असे अडते असोसिएशनचे अध्यक्ष  विलास भुजबळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com