वाशीम केव्हीकेत कृषी उद्योजकता प्रशिक्षणाचा समारोप

वाशीम केव्हीकेत कृषी उद्योजकता प्रशिक्षणाचा समारोप
वाशीम केव्हीकेत कृषी उद्योजकता प्रशिक्षणाचा समारोप

वाशीम ः राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थे (मॅनेज हैद्राबाद) द्वारे वाशीम कृषी विज्ञान केंद्राची जिल्ह्यात अॅग्री क्लिनिक व अॅग्री बिझनेस प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता निवड करण्यात अालेली आहे. येथे अायोजित दोन महिने कालावधीच्या निवासी प्रशिक्षण घेण्यात अाले. ३२ युवकांना कृषी उद्योजक बनविण्याकरिता सक्षम करण्यात आले.

या अॅग्री क्लिनिक व अॅग्री बिझनेस या प्रशिक्षणाचा समारोप नाबार्डचे सहायक महाप्रबंधक विजय खंडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. एल. काळे, नोडल आॅफिसर एस. के. देशमुख, आर. एस. डवरे, डी. एन. इंगोले व एस. आर. बावस्कर या प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डाॅ. काळे यांनी कृषी विज्ञान केंद्र या प्रशिक्षणार्थींना तांत्रिकदृष्ट्या कृषी उद्योग उभारणीकरिता साह्य करेल, असे सांगितले. विजय खंडरे यांनी नाबार्डच्या योजनांची माहिती दिली. 

दत्तात्रय चैधरी यांनी उद्योजकासाठी लागणाऱ्या आवश्यक गुणांची माहिती, योग्य व्यवसायाची निवड, प्रकल्प अहवालाचे महत्त्व व सामाजिक कार्याची आवड असल्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थींपैकी पात्र उद्योजकांना ५० टक्के अनुदानावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून उद्योग उभारणीसाठी प्राधान्य देऊ, असे सांगितले. प्रशिक्षणार्थींपैकी राहुल खंडारे, संदीप चौधरी, ओमप्रकाश देशकरी, पुंडलिक महल्ले यांनी मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com