agriculture news in marathi, engrave in rivers, amaravati, maharashtra | Agrowon

अमरावती जिल्ह्यातील नदीनाल्यांमध्ये खोदणार चर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

अमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळीत वाढ व्हावी म्हणून गावच्या परिसरातून वाहणाऱ्या प्रत्येक नदी, नाल्यात आडवे चर खोदण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.

जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्‍त संजय निपाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. चारथळ, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे उपस्थित होते. 

अमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळीत वाढ व्हावी म्हणून गावच्या परिसरातून वाहणाऱ्या प्रत्येक नदी, नाल्यात आडवे चर खोदण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.

जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्‍त संजय निपाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. चारथळ, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे उपस्थित होते. 

नदी, नाल्यांमध्ये आडवे बांध टाकण्याची ही संकल्पना जोरकसपणे राबविण्यात येईल, असा निर्धार या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. चंद्रभागा, पूर्णा या मोठ्या नद्यांसह जिल्ह्यातील विविध नदी व नाल्यांत अडीच फूट चर ठिकठिकाणी खणल्यामुळे पाणी मुरायला मदत होईल व पाऊस येताच भूजलपातळीत सुधारणा होईल. ही मोहीम जिल्हाभर राबविण्याचे आवाहन पालकमंत्री पोटे यांनी केले.

पाणीटंचाई निवारणार्थ यंत्रणेकडून थेट गावात पोचून तेथील गरज लक्षात घेऊन कामे झाली पाहिजेत. जिथे विहिरी अधिग्रहित करणे, टॅंकर सुरू करणे आदी उपाययोजनांची आवश्‍यकता असेल, तिथे ती तत्काळ व्हावी, त्यासाठी सर्वांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. केवळ कागदोपत्री कार्यवाहीत खोळंबून राहू नये. विनाविलंब कृती होणे आवश्‍यक आहे. नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घ्या व तत्काळ तोडगा काढा. प्रत्येक गावच्या सरपंच, ग्रामसेवकांशी रोज संपर्क ठेवा. केवळ तात्कालिक उपययोजना नकोत. पावसाळ्यात पाणी साठून राहण्यासाठी नदीत आडवे चर घ्यावे. रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये जलसंधारणाची कामे जोरदारपणे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या वेळी जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाणीटंचाईचा आढावा त्यांनी घेतला. 

अशी आहे स्थिती
मोर्शी तालुक्‍यात ४४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. वरुडमध्ये अधिग्रहित विहिरींची संख्या २८ आहे. चिखलदरा तालुक्‍यात २० गावांत टँकर सुरू आहेत. अमरावती तालुक्‍यात ४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ३ गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. तिवसा तालुक्‍यात २१ विहिरी अधिग्रहित केल्या असून, २ टॅंकर सुरू आहेत. धामणगावमध्ये ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, एका टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव खंडेश्‍वरमध्ये ३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. चांदूरबाजार तालुक्‍यातील घाटलाडकीत २ टॅंकर सुुरू आहेत.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...