Agriculture news in marathi, enough rainfall not coming in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ७६ पैकी ७२ तालुक्यांत अपेक्षित पाऊस नाहीच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी तब्बल ७२ तालुक्यांत आजवर अपेक्षित पाऊस झालाच नाही. जो झाला त्यामध्ये सर्वसमावेशकता व जोर नव्हता. दुसरीकडे केवळ चार तालुक्यांत पावसाने अपेक्षित हजेरी लावली. १३ तालुक्यांत तर अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. खास करून बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बिकट स्थिती कायम असल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी तब्बल ७२ तालुक्यांत आजवर अपेक्षित पाऊस झालाच नाही. जो झाला त्यामध्ये सर्वसमावेशकता व जोर नव्हता. दुसरीकडे केवळ चार तालुक्यांत पावसाने अपेक्षित हजेरी लावली. १३ तालुक्यांत तर अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. खास करून बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बिकट स्थिती कायम असल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्यात १ जून ते १३ ऑगस्टदरम्यान सरासरी ४२६.५३ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. मंगळवारपर्यंत (ता. १३) सरासरी २९३.३८ मिलिमीटर पाऊस झाला. वार्षिक सरासरी ७७९ मिलिमीटर असलेल्या मराठवाड्यात पावसाने मोठी ओढ दिली. अर्धा पावसाळा संपल्यात जमा असताना वार्षिक सरासरीच्या केवळ ३७.६६ टक्‍केच पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुक्‍यांपैकी केवळ सिल्लोड, सोयगाव, वैजापूरमध्ये अपेक्षित पाऊस झाला. उर्वरित सर्व तालुक्यांत अपेक्षेच्या केवळ ६० ते ८८ टक्‍के पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत फारसा पाऊस झालाच नाही. परभणी जिल्ह्यातील नऊही तालुक्‍यांतही हीच स्थिती राहिली. जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, जिंतूर आदी तालुक्यांत अपेक्षेच्या ६० टक्‍केही पाऊस झाला नाही. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्‍यात केवळ ४५.९३ टक्‍केच पाऊस झाला. उर्वरित तालुक्‍यांत ६८ ते ८८ टक्‍के पाऊस झाला. 

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्‍यांपैकी केवळ मुदखेडचा अपवाद वगळता एकाही तालुक्‍यात अपेक्षित पाऊस नाही. देगलूर तालुक्‍यात अपेक्षेच्या केवळ ५८ टक्‍के, तर किनवट व माहूर तालुक्‍यात अपेक्षेच्या ९४ टक्के पाऊस झाला. बीड जिल्ह्यावर पावसाची यंदा कमालीची अवकृपा राहिली. जिल्ह्यातील ११ पैकी एकाही तालुक्‍यात अपेक्षेच्या ६० टक्‍के पाऊस झाला नाही. दुसरीकडे गेवराई, शिरूर कासार, वडवणी, अंबाजोगाई, केज, धारूर आदी तालुक्‍यांत ४५ टक्‍केही पाऊस झाला नाही. 

लातूर जिल्ह्यातील १० तालुक्‍यांपैकी लातूर, औसा व चाकूरमध्ये अपेक्षेच्या ५० टक्‍के पाऊस झाला नाही. इतर ठिकाणीही हीच स्थिती राहिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ पैकी कळंब, भूम, परंडा तालुक्यांत अपेक्षेच्या ५० टक्के, वाशी, उस्मानाबाद तालुक्यांत ६० टक्‍केही पाऊस नाही.


इतर बातम्या
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...