अकोला जिल्ह्यात हरभरा विक्रीसाठी नावनोंदणी सुरू

अकोला जिल्ह्यात हरभरा विक्रीसाठी नावनोंदणी सुरू
अकोला जिल्ह्यात हरभरा विक्रीसाठी नावनोंदणी सुरू

अकोला : हरभरा हमीभावात विक्री करण्यासाठी शासनाकडून आॅनलाइन नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमुळे शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे. परिणामी नावनोंदणीला प्रतिसाद कमी प्रमाणात मिळत असल्याचे समाेर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७०० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असल्याची माहिती मिळाली. 

या वर्षात मूग, उडीद, सोयाबीन, तूर आणि आता हरभऱ्याची शासनाकडून हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे. मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी थांबली आहे. तुरीची खरेदी अंतिम टप्प्यात आहे. आता हरभरा खरेदीसाठी नावनोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. परंतु नावनोंदणी करण्यासाठी डिजिटल कागदपत्रे लागत असल्याने शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यापूर्वी अशी अट नव्हती. त्यामुळे तूर विक्रीसाठी जिल्ह्यात १७ हजारांवर शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात साडेतीन हजार शेतकऱ्यांचीच आजवर तूर खरेदी झाली. नावनोंदणी करूनही अनेकांनी तूर विक्रीला आणली नाही. बाजारभाव व हमीभावात फरक असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्रावर शेतीमाल विक्रीस टाळाटाळ केली.  

रब्बीत पेरणी झालेल्या हरभऱ्याचा हंगाम जोमात आहे. शासनाने हरभरा खरेदीसाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून नावनोंदणी सुरू केली. अनेक दिवस कागदपत्रांची पूर्तता करण्यातच वेळ निघून गेला. जिल्ह्यात असलेल्या सात केंद्रांवर ३७०० शेतकऱ्यांची नावनोंदणी झाली. या आठवड्यापासून नावनोंदणी वेग घेतल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नोंदणीला आजवर प्रतिसाद कमी असल्याने व इतर कारणांमुळे प्रत्यक्ष खरेदीला सुरवात करण्यात आली नव्हती. मात्र आता दोन-तीन दिवसांत खरेदीला सुरवात केली जाणार असल्याचे समजते. यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत नाही. खरेदी सुरू होताना शेतकरी त्या ठिकाणी किती माल विक्रीला आणतात, याबाबत यंत्रणा साशंक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com