Agriculture news in marathi Enter hospital safety details | Agrowon

रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा : मुंबई उच्च न्यायालय

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी राज्य सरकारने कशाप्रकारे केली आहे, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी राज्य सरकारने कशाप्रकारे केली आहे, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

कोविड १९चा संसर्ग झालेल्या रुग्णांना ठेवलेल्या रुग्णालयात आग लागल्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. या पार्श्र्वभूमीवर न्यायालयाने या संबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर अनेकदा सुरक्षे संबंधीचे निर्देश दिले आहेत. सोमवारी मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. आग लागण्याच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी राज्य सरकारने कोणत्या प्रतिबंधक उपाय योजना सुरू केल्या आहेत, यावर प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने दिले. 

दर सहा महिन्यात अग्निशमन सेवा संचालनालयाकडून प्रत्येक रुग्णालयाला ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते, असे निर्देश या पूर्वी न्यायालयाने दिले आहेत. मात्र या नियमांची पूर्तता होत नाही, असा दावा याचिकादार नीलेश नवलाखा यांच्या वतीने ॲड राजेश इनामदार यांनी खंडपीठापुढे केला. प्रत्येक कोविड रुग्णालयात एक नोडल अधिकारी नियुक्त असणे आवश्यक असून, आग प्रतिबंधक विभागाअंतर्गत दर महिन्याला फायर ऑडिट करणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती इनामदार यांनी दिली. 

राज्य सरकारने संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली असून, रुग्णालय नोंदणीसाठी काही निकष बंधनकारक केले आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. यामध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा उभारणे, ऑडिट करणे, आग प्रतिबंधक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे इ. तरतुदी आहेत. जर हे प्रमाणपत्र नसेल तर नोंदणी किंवा नूतनीकरण होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. याचिकेवरील पुढील सुनावणी ऑगस्ट अखेरीस आहे. 
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...