Agriculture news in Marathi Enter the names of the clans on the computer seventeen | Page 2 ||| Agrowon

संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021

हस्तलिखित सातबारा पत्रकी असलेली कूळ शेतकऱ्यांची नावे संगणकीय उताऱ्यावर नोंद करावीत, अशी मागणी चंदगड तालुक्यातील चनेहट्टी, राजगोळी, गणेशवाडी, राजेवाडी, राजगोळी खुर्दच्या शेतकऱ्यांनी फेरी काढून प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे केली आहे.

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा पत्रकी असलेली कूळ शेतकऱ्यांची नावे संगणकीय उताऱ्यावर नोंद करावीत, अशी मागणी चंदगड तालुक्यातील चनेहट्टी, राजगोळी, गणेशवाडी, राजेवाडी, राजगोळी खुर्दच्या शेतकऱ्यांनी फेरी काढून प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे केली आहे.

दसरा चौकातील शिवाजी पुतळ्यापासून फेरी काढून सर्व शेतकरी प्रांत कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी वाघमोडे यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे, की या गावातील शेतकरी हे वाडवडीलांपासून इनाम असलेल्या जमिनी कसत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच चालतो. या जमिनी शेतकऱ्यांच्याच ताब्यात आहेत. या जमिनीचे संगणकीय सातबारा उतारा करताना इतर हक्कातील कुळांची नावे रद्द केली आहेत. जमिनीच्या मूळ मालकाने पोकळ नाव नोंद असल्याचा फायदा घेऊन जमिनी कुळांना कल्पना न देता परस्पर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना विक्री करीत आहेत. यामुळे जमिनीचे कब्जेधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 

काही गुंड प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्यांना धमकावत असल्याने बऱ्याच कुटुंबांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यातूनच काही शेतकऱ्यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चंदगड तहसीलदारांना कुळांची नावे सातबारा पत्रकी नोंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तहसीलदारांकडे मागणी अर्जही दाखल केला आहे. त्यावर तहसीलकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबात असंतोष वाढलेला आहे. तसेच यापूर्वीही तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले होते. त्या वेळी तहसीलदारांनी योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही दिली होती. त्याचीही पूर्तता झालेली नाही.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...