Agriculture news in Marathi Enter the orange pruning machine 'Pandekrivi' | Page 2 ||| Agrowon

संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

संत्र्याच्या बागा उभ्या राहत असून, संत्रा झाडांची छाटणी करण्यासाठी अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाच्या फळशास्त्र विभागामार्फत या यंत्राची हाताळणी केली जाणार आहे.

अकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांतील काही भागात संत्र्याच्या बागा उभ्या राहत असून, संत्रा झाडांची छाटणी करण्यासाठी अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाच्या फळशास्त्र विभागामार्फत या यंत्राची हाताळणी केली जाणार आहे.

संत्र्याच्या झाडांची छाटणी ही मजुरांकडून केली जाते. हे किचकट स्वरूपाचे व वेळखाऊ पद्धतीचे काम आहे. या भागात अद्यापही यंत्राचा वापर होत नव्हता. अत्याधुनिक स्वरूपाचे यंत्र उपलब्ध नसल्याने संत्रा बागायतदार पारंपरिक पद्धतीने छाटणीचे काम करीत होते. ही गरज ओळखत कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात फळशास्त्र विभागाने फलोत्पादन खात्याकडे यंत्रासाठीचा प्रस्ताव दिला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर फलोत्पादन अभियानातून हे यंत्र खरेदी करण्यात आले. मंगळवारी (ता. १२) झालेल्या शिवारफेरी दरम्यान हे यंत्र शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकासह दाखवण्यात आले. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना यंत्राचा वापर, फायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. 

शेतकऱ्यांनी उत्सुकतेने यंत्राची पाहणी करीत माहिती घेतली. सघन पद्धतीने लागवड केलेल्या बागांमध्ये विद्यापीठाने शिफारस केलेल्या १० फूट उंचीपर्यंतच्या छाटणीचे काम उत्तम पद्धतीने यंत्राद्वारे होऊ शकते. या यंत्राच्या साह्याने केलेल्या छाटणीने दिवसभरात अडीच ते तीन एकरापर्यंत चांगल्या पद्धतीचे काम करणे सुकर होते. यासाठी प्रशिक्षित चालक नेमण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करून विद्यापीठाकडे मागणी केल्यास हे यंत्र तासांप्रमाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शशांक भराड यांनी दिली. या पूर्वी हे यंत्र नागपूर, काटोल परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. आता अकोल्यात उपलब्ध झाले.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार...जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी...
आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखामुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
शास्त्रीय पशुपालनातून मिळवले आर्थिक...कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले)...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...