agriculture news in marathi, Enter Pakistan for Surgical strike : All party Demand | Agrowon

पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा : सर्वपक्षीय मागणी
सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही शनिवारी (ता.१६) सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र, या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये नव्हे तर पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक करा, असे आवाहनही सरकारला केले.

नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही शनिवारी (ता.१६) सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र, या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये नव्हे तर पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक करा, असे आवाहनही सरकारला केले.

पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ४० हून अधिक जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध आक्रमकपणे कारवाईची मागणी देशभरातून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलावून या हल्ल्याबद्दल चर्चा केली. या वेळी संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुख अब्दुल्ला, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह तृणमूल कॉंग्रेस, बिजू जनता दल, तेलुगू देसम, डावे पक्ष आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘पीडीपी'चा मात्र कोणीही प्रतिनिधी या बैठकीत नव्हता.

या वेळी पुलवामातील हल्ल्याचा तसेच सीमेपलीकडून पाठिंबा मिळणाऱ्या दहशतवादाचा एकमुखाने निषेध करणारा ठरावही संमत करण्यात आला. सर्व प्रकारच्या तसेच सीमेपलीकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा एकमुखाने निषेध करताना सर्व पक्ष हुताम्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाची झळ भारताला गेल्या तीन दशकांपासून सहन करावी लागते आहे. मात्र, या आव्हानांचा भारताने सातत्याने ठोसपणे मुकाबला केल्याचे या ठरावात म्हटले आहे.

डॉ. फारुख अब्दुल्ला तसेच विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, सुरक्षा दलांवरील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी बोलावून चर्चा करावी, अशी सूचना केली. या सूचनेला अन्य पक्षांनीही पाठिंबा दिला. जम्मूमध्ये काश्‍मिरी तरुणांना संतप्त जमावाकडून लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनांचाही डॉ. अब्दुल्लांनी उल्लेख केला. यावर गृहमंत्र्यांनी सांप्रदायिक सलोखा कायम राखण्याचे आश्‍वासन देताना अशा कृत्यांमध्ये भाजप कार्यकर्ते असले तरीही त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यान सरकारने इंदिरा गांधींप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध ठोस कारवाईचे आवाहन केले. सर्जिकल स्ट्राइकबद्दल सातत्याने सांगितले जाते. मात्र ही कारवाई भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये होती. त्याऐवजी पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर दिले जावे, अशी मागणी शिवसेनेने केली. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही पाकिस्तानला शांततेची भाषा कळत नसल्याने त्यांना कायमचा धडा शिकवावा, अशी मागणी केली. तसेच पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर मुक्त करण्याची सूचनाही त्यांनी सरकारला केली.

हल्ल्याची तपशीलवार माहिती
प्रारंभी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ‘सीआरपीएफ'च्या अतिरिक्त महासंचालकांनी हल्ल्याची तपशीलवार माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या घटनाक्रमावर भाष्य केले. गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्‍मीरला दहशतवादाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सरकारने सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक दिल्याचे सांगितले. तसेच जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता नको असणाऱ्या घटकांनी वैफल्यातून हा दहशतवादी हल्ला केला आहे, असे मतही मांडल्याचे संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा जगातील सुमारे ४८ देशांनी निषेध केला आहे. व्हाइट हाउसने दिलेल्या निवेदनात हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हुतात्मा पडलेल्या जवानांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानने आपल्या भूमीचा वापर दहशतवाद्यासाठी करू देऊ नये, असेही व्हाइट हाउसने नमूद केले आहे. या हल्ल्यामागचा सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी अमेरिका भारताला सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यात जखमी झालेले जवान लवकर बरे होवोत, अशी कामना व्यक्त करण्यात आली आहे. रशियन दूतावासानेही हल्ल्याची निंदा केली आहे. याशिवाय फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इराण, इस्रायल आदींसह सुमारे ४८ देशांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्‌विट करत म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम्ही आपल्या आणि भारताचे सुरक्षा दल आणि जनतेसमवेत आहोत. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो.

बोल्टन-डोवाल यांच्यात चर्चा
वॉशिंग्टन/दिल्ली :
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताकडून प्रत्युत्तरासाठीच्या पर्यायांचा विचार केला जात आहे. यादरम्यान, भारताला स्वसंरक्षण करण्याचा संपूर्ण अधिकार असून, या अधिकारास पाठिंबा असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून संवाद साधला. बोल्टन यांनी सीमेवरील दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. या हल्ल्यातील सूत्रधारांवर आणि समर्थकांवर कारवाई करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. याबद्दल डोवाल यांनी अमेरिकेचे आभार मानले आहे. 

दहशतवाद्यांना `फंडिंग' थांबवा : अमेरिका
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानने पाठिंबा देण्याचे आणि अर्थसाह्य करण्याचे तात्काळ थांबवावे, असे आवाहन अमेरिकेने केले. जैशे मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना भविष्यात हल्ले करणार नाहीत, यासाठी पाकिस्तानने उपाययोजना कराव्यात, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
पाकिस्तानस्थित जैशे मोहंमद संघटनेने पुलवामा येथे घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान हुतात्मा झाले. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले. यासंदर्भात अमेरिकी स्टेटच्या प्रवक्‍त्याने म्हटले, की २००२ मध्ये पाकिस्तानने जैशे मोहंमद संघटनेविरुद्ध कारवाई केली होती. मात्र ही संघटना अजूनही पाकिस्तानात सक्रिय आहे. अमेरिकेने जैशे मोहंमदला डिसेंबर २००१ मध्ये परकी दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे. यानुसार अमेरिका काम करत आहे. भारतीय उपखंडात दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या संघटनांना पाकिस्तानने थारा देऊ नये. 
   पाकिस्तानने दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे थांबवावे, असे आवाहन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या नियमाचे पालन पाकिस्तान करेल, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...