Agriculture News in Marathi At the entrance of the market committee cess A committee will be set up for recovery | Page 2 ||| Agrowon

पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर वसुलीबाबत समिती स्थापन करणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह राज्यातील विविध बाजार समित्यांमधील सेसची (बाजार शुल्क) वसुली खरेदीदारांकडून रोज प्रवेशद्वारावरच वसूल करण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्यात येईल. 

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह राज्यातील विविध बाजार समित्यांमधील सेसची (बाजार शुल्क) वसुली खरेदीदारांकडून रोज प्रवेशद्वारावरच वसूल करण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्यात येईल. समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

पुणे बाजार समितीमधील आडते असोसिएशन आणि पूना मर्चटस चेंबर ने सेस प्रवेशद्वारावर वसूल करण्याची मागणी केली होती. या मागणी बाबत मंत्री पाटील यांनी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्‍चात तंत्रज्ञान संस्थेत बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, पणन सहसंचालक विनायक कोकरे, मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे, सचिव संदीप देशमुख, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, मर्चटस चेंबरचे वालचंद संचेती आदी उपस्थित होते. 

या बाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ‘‘बाजार समितीमधील खरेदीदारांकडून प्रवेशद्वारावर सेसच्या वसुलीची मागणी विविध व्यापारी असोसिएशन कडून मागणी करण्यात आली आहे. गेटवर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. शेतकरी व ग्राहकांचे हीत लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकले पाहिजे. समितीच्या कामकाजात गैरव्यवहार आणि कामगारांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण होणार नाही या बाबत दक्षता घेण्यात यावी.‘‘ 


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...