जैविक किटकनाशकांद्वारे पर्यावरणाचे संतुलन साधता येईल ः डॉ. मित्तर

परभणी : जैवतंत्रज्ञानाच्‍या आधारे विकसित केलेल्या जैविक किटकनाशकांचा वापर केल्‍यास पर्यावरणाचे संतुलन साधता येईल’’, असे प्रतिपादन आस्‍ट्रेलिया येथील क्‍विन्‍सलॅड विद्यापीठाच्या संचालक डॉ. निना मित्‍तर यांनी केले.
Environmental by biological pesticides Balance can be achieved: Dr. Mittar
Environmental by biological pesticides Balance can be achieved: Dr. Mittar

परभणी : ‘‘शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, त्‍यास निश्चितच मर्यादा आहेत. त्याऐवजी जैवतंत्रज्ञानाच्‍या आधारे विकसित केलेल्या जैविक किटकनाशकांचा वापर केल्‍यास पर्यावरणाचे संतुलन साधता येईल’’, असे प्रतिपादन आस्‍ट्रेलिया येथील क्‍विन्‍सलॅड विद्यापीठाच्या संचालक डॉ. निना मित्‍तर यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) तर्फे ‘आधुनिक शेतीतील अद्ययावत डिजिटल व जैवतंत्रज्ञान साधने’ यावर ऑनलाइन आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन गुरुवार (ता.४) ते सोमवार (ता.८) करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उद्घघाटप्रसंगी त्या बोलत होत्या. कुलगुरु डॉ. अशोक ढवण अध्यस्थानी होते. नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अगरवाल, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्रकल्‍पाचे मुख्‍य संशोधक डॉ. गोपाल शिंदे, आयोजक डॉ.अच्‍युत भरोसे आदी सहभागी झाले. 

डॉ. ढवण म्‍हणाले,‘‘आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गामुळे जागतिक पातळीवर जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाची माहिती देशातील कृषी संशोधकांना होईल. जागतिक दर्जाच्या संशोधन कार्यास गती प्राप्‍त होईल.’’ 

डॉ. अगरवाल म्हणाले, ‘‘नाहेप प्रकल्‍पामुळे जागतिक स्‍तरावरील कृषाी संशोधनाबाबत देशातील कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना ज्ञान होऊन, संशोधन कार्यास दिशा प्राप्‍त होईल.’’ 

या प्रशिक्षणात अमेरिका, ऑस्‍ट्रोलिया, नेपाळ,अफगाणिस्तान, कॅनडा आदीसह देशातील विविध राज्‍यातून कृषी शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी झाले. जैवतंत्रज्ञानाशी निगडीत विविध विषयावर ऑस्‍ट्रेलियातील मेलबोर्न विद्यापीठातील डॉ.जार्ल्‍स राबीन, अमेरिकेतील वॉशिंग्‍टन स्‍टेट युनिवर्सिटीचे शास्‍त्रज्ञ डॉ. प्रशांत स्‍वामी, मोहाली येथील राष्‍ट्रीय कृषी अन्‍न जैवतंत्रज्ञान संस्‍थेच्‍या डॉ. संस्‍कृती, गुजरात येथील जुनागड कृषी विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. रुकामसिंग तोमर, पुणे येथील डिएफआरचे डॉ. प्रशांत कवर, ऑस्‍ट्रेलियातील वेस्‍टेर्न सिडनी युनिवर्सिटीचे डॉ. सचिन चव्‍हाण, पुणे येथील डॉ.माधुरी पगारिया, किन्‍स युनिवर्सिटचे डॉ. अमोल घोडके, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्‍थेचे डॉ. चिना बाबु नाईक, काश्‍मीर कृषी विद्यापीठातील डॉ. साजेद माजिद झरगर मार्गदर्शन करतील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com