agriculture news in marathi, EPA will no longer approve product labels claiming glyphosate is known to cause cancer | Agrowon

ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही : अमेरिकेच्या पर्यावरणीय संरक्षण विभागाचे स्पष्टीकरण
वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकते हा दावा चुकीचा असून, तो ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेच्या पर्यावरणीय संरक्षण विभागाने (ईपीए) दिले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचा सावधान करण्याचा इशारा ग्लायफोसेट उत्पादनाच्या लेबलवर नमूद केल्यास तो मंजूरही केला जाणार नसल्याचेही ‘ईपीए’ने अमेरिकेतील कंपन्यांना स्पष्ट केले आहे.

वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकते हा दावा चुकीचा असून, तो ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेच्या पर्यावरणीय संरक्षण विभागाने (ईपीए) दिले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचा सावधान करण्याचा इशारा ग्लायफोसेट उत्पादनाच्या लेबलवर नमूद केल्यास तो मंजूरही केला जाणार नसल्याचेही ‘ईपीए’ने अमेरिकेतील कंपन्यांना स्पष्ट केले आहे.

सध्या ग्लायफोसेट हे तणनाशक जगभरात वादाच्या भोवऱ्यात आढळले आहे. विशेषतः अमेरिकेत हे तणनाशक अधिक वादग्रस्त आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या तणनाशकाच्या वापराने मानवांत कर्करोग झाल्याचे अनेक खटले न्यायालयांमधून दाखल आहेत. त्यासाठी हे तणनाशक विकसित करणाऱ्या व त्याचे उत्पादन करणाऱ्या अमेरिकेतील मोन्सॅन्टो कंपनीला भक्कम नुकसानभरपाई देखील द्यावी लागली आहे. सध्या बायर या बहुराष्ट्रीय कंपनीने मोन्सॅन्टो कंपनीचे हक्क अधिग्रहित केले आहेत.

कॅलिफोर्निया राज्याने बनवला कायदा
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात पिण्याचे पाणी व उत्पादनांतील विषारी घटक यांच्या अनुषंगाने कायदा अस्तित्वात आहे. एखाद्या उत्पादनातील घटकामुळे मानवी आरोग्याला धोका पोचण्याची शक्यता असल्यास तसा इशारा उत्पादनावर देणे कायद्यान्वये बंधनकारक केले आहे. त्यानुसार कर्करोग वा तत्सम धोका निर्माण करणाऱ्या रसायनांची यादी तेथील सरकारतर्फे प्रसिद्ध केली जाते. त्यासाठी ईपीए तसेच आयएआरसीसारख्या संस्थांची तांत्रिक मार्गदर्शन वा संदर्भही घेतले जातात. ग्राहकांमध्ये अशा रसायनांबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना त्यासंबंधी सावधान करणे, हे त्यामागील उद्दिष्ट असते. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन (आयएआरसी) संस्थेने ग्लायफोसेट या तणनाशकाची वर्गवारी कर्करोगकारक रसायनांमध्ये केल्याचे प्रसिद्ध केले. त्यानंतर कॅलिफॉर्निया राज्याने आपल्या कायद्यान्वये उत्पादनांच्या लेबलवर तसा इशारा प्रसिद्ध करण्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.

लेबलवर इशारा असल्यास मंजुरी नाही
दरम्यान कॅलिफोर्निया राज्याने लादलेले हे नियम चुकीचे असल्याचे ‘ईपीए’ संस्थेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील कीडनाशक उत्पादनांची नोंदणी, लेबल क्लेम्स, पर्यावरणीय सुरक्षा या अनुषंगाने नियंत्रण ठेवण्याचे काम ही संस्था करीत असते. ग्लायफोसेटमुळे कर्करोग होऊ शकतो, असा इशारा या उत्पादनाच्या लेबलवर असेल तर तो चुकीचा व ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे ‘ईपीए’ने म्हटले आहे. अमेरिकेतील कीटकनाशक, बुरशीनाशक व मूषकनाशक कायद्यांतर्गत (फिफ्रा) उत्पादनांना लेबल देण्याच्या अन्वये तो ग्राह्य मानता येणार नाही. अमेरिकेतील जी कंपनी आपल्या उत्पादनाच्या लेबलवर असा सावधान करणारा इशारा प्रसिद्ध करेल त्या उत्पादनाला मंजुरी देण्यात येणार नाही असेही ‘ईपीए’ने स्पष्ट केले आहे. संबंधित कंपन्यांसाठी ‘ईपीए’ तशा मार्गदर्शक सूचना प्रसारित करणार आहे. आपल्या उत्पादनाच्या लेबलवर प्रत्येक कंपनी जी माहिती प्रसिद्ध करीत असते ती ग्राहकासाठी अचूक असायला हवी, दिशाभूल करणारी नसावी असे ‘ईपीए’चे म्हणणे आहे.

ग्लायफोसेट कर्करोगकारक नसल्याचे स्पष्टीकरण
यंदाच्या एप्रिलमध्ये ‘ईपीए’ने ग्लायफोसेट तणनाशकाच्या पुनर्मूल्यांकनाची पुढील पायरी पार केली. त्यानुसार ग्लायफोसेट हे कर्करोगाला निमंत्रण देणारे तणनाशक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय उत्पादनाच्या लेबलवर दिलेल्या मार्गदर्शक माहितीनुसार त्याचा वापर केल्यास मानवी वा सार्वजनिक आरोग्याला कोणताही धोका नसल्याचा निष्कर्षही ‘ईपीए’ने काढला आहे. अमेरिकेतील अन्य राज्ये तसेच जगभरातील अन्य देशांचे या संबंधीचे निष्कर्षदेखील आपल्या निष्कर्षांशी मिळतेजुळते असल्याचे ‘ईपीए’ने स्पष्ट केले आहे. ‘ईपीए’ संस्था ज्या वेळी आपले निष्कर्ष प्रसिद्ध करते व त्याविषयी ठाम भूमिका घेते त्या वेळी अन्य कोणत्याही राज्याची भूमिका त्याला छेद देणारी विरोधी असण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत कोणतेही राज्य आपल्या स्वतंत्र कायदे नियमांची अंमलबजावणी करू शकत नाही. कॅलिफॉर्निया राज्याची अशी भूमिका योग्य नसल्याची टीका टिप्पणीही ‘ईपीए’ने केली आहे.

न्यायालयाकडूनही आदेश
कॅलिफोर्निया राज्याने उत्पादनाच्या लेबलवर संबंधित इशारा प्रसिद्ध करण्याबाबत कंपन्यांना सक्तीचे नियम सुरू केले होते. मात्र या राज्यात ग्लायफोसेटच्या संदर्भाने खटले सुरू असल्याने तेथील न्यायालयाकडून खटले निकालात निघेपर्यंत असे इशारे बंधनकारक न करण्याबाबतही सांगण्यात आले होते. तसेच २०१८ फेब्रुवारी मध्ये राज्यातील पूर्व जिल्हा न्यायालयाने अशी सक्ती न करण्याचे कायदेशीर आदेशही राज्याला दिले आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...