दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : अशोक चव्हाण
समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक विषय बनत चालला आहे. धरणे भरली की त्या वर्षी पाण्याच्या समन्यायी वाटपबाबत कोणी बोलत नाही, अशी मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक विषय बनत चालला आहे. मराठवाड्यातील धरणे भरायला सध्या पाचपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागतो. पाणी नसताना पाण्याप्रती सर्व जागरूक होतात, मात्र एकदा धरणे भरली की त्या वर्षी पाण्याच्या समन्यायी वाटप व पाणीप्रश्नाबाबत कोणी बोलत नाही, अशी खंत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे शनिवारी (ता. २३) झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘वेळेच्या आत पाणी वाटपाच्या पाळ्या लक्षात घेऊन पूर्वीपासूनच याची डागडुजी हाती घ्यायला हवी. विविध प्रकल्पातील पाण्याचे रोटेशन हे नियोजन केल्याप्रमाणे पोहचलेच पाहिजे. पूर्णा प्रकल्पांतर्गत येलदरी व सिद्धेश्वर दोन धरणातून ६६२.४८ दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी परभणी, हिंगोली, जिंतूर, वसमत, औंढा नागनाथ ही शहरे व ग्रामीण भागासाठी ७८.७८ दलघमी पाणी आरक्षीत केले आहे.
सिंचनासाठी ५८३.६९ दलघमी पाणी उपलब्ध आहे. यातून ५५ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन व उन्हाळी हंगामात चार पाणी पाळयाचे नियोजन केले आहे. निम्न मानार प्रकल्पात ९८.६१ दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नायगाव, कंधार या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी ४.६१ दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ९४.०० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. यातून सुमारे २३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे.
उर्ध्व पैनगंगा याप्रकल्पात यावर्षी ७८७.७८ दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ७७.१५ दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१०.६४ दलघमी पाणी उपलब्ध झाले. या पाण्यातून ८६ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळया व उन्हाळी हंगामात चार पाणी पाळयांचे नियोजन केले आहे.
विष्णुपुरीतील पाणी पिण्यासह शेतीसाठीही
शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात शंभर टक्के पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून त्यातून २१.० दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातून २४.० दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. असे एकूण १२५.९५ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून १०९.६३ दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे.
पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी ३८.५५ दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१.०८ दलघमी पाणी उपलब्ध झाले असून सुमारे १३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या दिल्या जाणार आहेत.
- 1 of 1054
- ››