Agriculture news in marathi The erosion season of eighteen factories in Marathwada, Khandesh was over | Agrowon

मराठवाडा, खानदेशातील अठरा कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील १८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकल्यात जमा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे गाळप व साखरेचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील १८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकल्यात जमा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे गाळप व साखरेचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी जवळपास ८८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. तर, जवळपास २१ कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला होता. 

औरंगाबाद येथील साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला होता. आपल्या क्षमतेच्या तुलनेत चालू न शकलेल्या या १८ कारखान्यांपैकी बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम फेब्रुवारी व मार्च महिन्यातच उरकला. नंदुरबार जिल्ह्यातील ३ साखर कारखान्यांनी ७ लाख ४३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करताना १०.२५ टक्के साखर उताऱ्याने सात लाख ६१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. 

जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने १ लाख ४३ हजार ५९२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर, सरासरी १०.६८ च्या साखर उतारा १ लाख ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी ५ लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप, तर ५ लाख २५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन सरासरी ९.५% साखर उतारा राखत केले. जालना जिल्ह्यातील ४ साखर कारखान्यांनी १२ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर, १३ लाख ३७ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन १०.८० साखर उतारा राखत केले. 

बीड जिल्ह्यात ५ कारखान्यांचे गाळप 

बीड जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी यंदा गाळप केले. त्यांनी १० लाख २३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९ लाख १२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर, सरासरी ८.९१ टक्के साखर उतारा राखला. पाचही कारखान्यांनी सरासरी ९.७४ टक्के, तर खासगी कारखान्यांनी १०.५ टक्के साखर उतारा राखल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...